32 C
Mumbai
Saturday, October 10, 2026
घरदेश दुनियाभारताच्या हल्ल्यानंतर डॉन दाऊद इब्राहिमची तंतरली, पाकिस्तानातून पळाला?

भारताच्या हल्ल्यानंतर डॉन दाऊद इब्राहिमची तंतरली, पाकिस्तानातून पळाला?

छोटा शकील आणि मुन्ना झिंगडा हे देखील फरार

Google News Follow

Related

भारताच्या हल्ल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातून पळाल्याची माहिती समोर आली आहे. छोटा शकील आणि मुन्ना झिंगडा हे सुद्धा पाकिस्तानातून पळाल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमने पाकिस्तान सोडले आहे. पाकिस्त्नान मधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय भारताने उडवल्यानंतर दाऊद इब्राहिम बिथरला असून पाकिस्तान सोडून पळून जाण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाहीये.

‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत भारताने हल्ला केल्यानंतर सुरक्षा एजन्सी पाकिस्तानवर बारीक नजर ठेवून आहे. पाकिस्तानात कोण येतंय, जातंय याकडे भारत लक्ष ठेवून आहे. याच दरम्यान, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारताच्या हल्ल्यामुळे घाबरला असून पाकिस्तान त्याने पळ काढल्याची महिती सुरक्षा एजन्सीला मिळाली आहे. दाऊद इब्राहिमसोबत छोटा शकील आणि मुन्ना झिंगडा हे देखील आहेत. हे तिघेजण पाकिस्तान सोडून इतर देशात पळून गेल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.

हे ही वाचा : 

राष्ट्रीय संकटाच्या वेळी संपूर्ण देश सरकार व सैन्य दलांसोबत उभा

भारत-पाकिस्तान तणाव: एमएस धोनीलाही राहावे लागेल तयार?

पाकला दणका! सिंधू पाणी वाटप करार स्थगितीवर जागतिक बँकेने स्पष्ट केली भूमिका; काय म्हटले?

“भित्रे शाहबाज शरीफ पंतप्रधान मोदींचे नाव घ्यायला घाबरतात…” पाक खासदाराने सरकारला पाडले उघडे

भारताची एजन्सी या माहितीची पडताळणी करत आहे. कारण, बऱ्याचवेळा दिशाभूल करण्यासाठी अशी माहिती व्हायरल केली जात असते. दाऊद इब्राहिम खरचं पाकिस्तान सोडून गेला का?, याचा तपास एजन्सी करत आहे. भारताने पीओके आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हल्ला करत उद्ध्वस्त करून टाकले होते.

या कारवाईत लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अनेक प्रमुखांसह १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले. भारताची कारवाई अजूनही सुरूच आहे. भारतावर कोणताही हल्ला झाला तर त्याला चोख उत्तर दिले जाईल, अशा इशाराही भारताने पाकिस्तानला दिला आहे. त्यामुळे भारताची कारवाई पाहून दाऊद इब्राहिमसह छोटा शकील आणि मुन्ना झिंगडा हे पाकिस्तान सोडून पळून गेल्याचे बोलले जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा