29.2 C
Mumbai
Thursday, November 5, 2026
घरविशेषपुतिन यांची संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी घेतली भेट

पुतिन यांची संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी घेतली भेट

Google News Follow

दुसऱ्या महायुद्धातील विजयाच्या ८०व्या वर्षगाठीनिमित्त रशियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारंभात भारतातर्फे सहभाग घेतलेल्या संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. संजय सेठ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने दहशतवादाविरोधात चालवलेल्या लढ्यात रशियाकडून मिळालेल्या पाठिंब्यासाठी आभार व्यक्त केला. संरक्षण राज्यमंत्री सेठ यांनी पुतिन यांच्याशी झालेल्या भेटीच्या आणि विजय दिन समारंभाच्या काही छायाचित्रांसह ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी लिहिले, “रशिया दौऱ्यात राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट घेऊन सन्मानित वाटले. ८०व्या विजय दिनाच्या वर्षगाठीनिमित्त आयोजित स्नेहभोजनात भारताचे प्रतिनिधित्व केले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्यात रशियाने दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानतो.

हेही वाचा..

भारताची एअर डिफेन्स सिस्टीम अभेद्य

आपल्याकडे पीओके परत घेण्याची क्षमता

‘आकाशतीर’ने कसा घेतला पाकिस्तानी ड्रोन्सचा अचूक वेध

राष्ट्रीय संकटाच्या वेळी संपूर्ण देश सरकार व सैन्य दलांसोबत उभा

संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, जे रांची येथून भाजपचे खासदार आहेत, गुरुवारी रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले. भारताचे राजदूत विनय कुमार आणि रशिया संरक्षण मंत्रालयाचे मेजर जनरल ओलेग मोलेसेव यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर सेठ यांनी रशियाचे उप संरक्षण मंत्री कर्नल जनरल अलेक्झांडर फोमिन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीत सहभाग घेतला. सेठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत बहुआयामी लष्करी आणि लष्करी-तांत्रिक सहकार्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांनी विद्यमान संस्थात्मक यंत्रणांच्या चौकटीत सहकार्य अधिक बळकट करण्यावर सहमती दर्शवली. भारत आणि रशिया भविष्यातही नियमित सल्लामसलत करत राहतील आणि बदलत्या परिस्थितीत परस्पर सहकार्य वाढवतील.

त्याआधी संजय सेठ यांनी दुसऱ्या महायुद्धातील बलिदानी सैनिकांच्या समाधीस्थळी श्रद्धांजली अर्पण केली. विजय दिनाच्या परेडमध्ये भारतातर्फे प्रत्यक्षात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार होते. मात्र, भारत-पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला दौरा स्थगित केल्याचे मानले जाते.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा