30.3 C
Mumbai
Tuesday, October 20, 2026
घरविशेषट्रम्प यांनी किमान १० टक्के बेसलाइन टॅरिफची केली पुष्टी

ट्रम्प यांनी किमान १० टक्के बेसलाइन टॅरिफची केली पुष्टी

Google News Follow

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, आयातीत वस्तूंवर अमेरिकेत किमान १० टक्के बेसलाइन टॅरिफ (मूलभूत शुल्क) लावले जाईल. हे टॅरिफ काही देशांसाठी अपवाद असू शकतात. दक्षिण कोरिया आणि इतर काही देश अमेरिकेच्या नव्या शुल्कांपासून वाचण्यासाठी किंवा त्याचा परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ट्रम्प यांच्याकडे विचारण्यात आले होते की, जे देश अमेरिकन निर्यातीवर शून्य टॅरिफ देतात, त्यांच्यावरही हा बेसलाइन टॅरिफ लागू असेल का. यावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, “तुमच्याकडे नेहमीच एक बेसलाइन असेल. काही प्रसंगी अपवाद होऊ शकतो. आपण पाहू, कोण आमच्यासाठी काही विशेष करतो का?

ते पुढे म्हणाले, “हे नेहमी शक्य असते, परंतु मूलत: तुमच्याकडे किमान १० टक्क्यांची बेसलाइन असते आणि त्यातील काही टॅरिफ खूप जास्तही असू शकतात – ४० टक्के, ५० टक्के, ६० टक्के – जसे की ते अनेक वर्षांपासून आमच्यासोबत करत आले आहेत. ट्रम्प यांनी सांगितले की, चार-पाच किंवा त्याहून अधिक व्यापार करार “लवकरच होणार” आहेत, परंतु कोणते देश हे करार करणार आहेत याची माहिती त्यांनी दिली नाही.

हेही वाचा..

चारधाम यात्रेतील हेलिकॉप्टर सेवा बंद

मातृ-शिशु आरोग्य निर्देशांकांमध्ये सुधारणा

नोरा फतेही काय म्हणाल्या भारतीय लष्कराबद्दल?

पाकिस्तानचे ५० पेक्षा जास्त ड्रोन, क्षेपणास्त्रे केली नष्ट

हे बेसलाइन टॅरिफ 5 एप्रिलपासून लागू झाले आहे. दक्षिण कोरियावर २५ टक्के टॅरिफ लागू असले तरी ट्रम्प यांनी ८ जुलैपर्यंत त्यावर स्थगिती दिली आहे, जेणेकरून टॅरिफ, नॉन-टॅरिफ अडथळे आणि इतर संबंधित मुद्यांवर चर्चा केली जाऊ शकेल. दरम्यान, अमेरिकेच्या विदेश विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, चीन आणि रशियामधील सातत्यपूर्ण सहकार्यामुळे अमेरिका आणि इतर देश “अधिक असुरक्षित” होतील, कारण या दोन्ही देशांच्या नेत्यांनी उत्तर कोरियाच्या समर्थनार्थ संयुक्त निवेदन दिले आहे.

चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी एक संयुक्त निवेदन जारी केले, ज्यामध्ये त्यांनी उत्तर कोरियाविरुद्ध एकतर्फी उपाययोजना आणि सैन्यदाबाच्या धोरणाचा त्याग करण्याचे आवाहन संबंधित देशांना केले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा