27 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरविशेषभारतीय लष्कर कशा प्रकारे करते पाकला नामोहरण

भारतीय लष्कर कशा प्रकारे करते पाकला नामोहरण

Google News Follow

Related

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला सतत नुकसान होत असले तरी त्याच्या कुरापती थांबण्याचे नाव घेत नाहीत. आता भारताने त्याच्या तीन एअरबेसवर निशाणा साधत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या या कारवाईबाबत परराष्ट्र तज्ज्ञ रोबिंदर सचदेव यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या तीन एअरबेसवर हल्ला करणे हे आवश्यक होते.

शनिवारी त्यांनी सांगितले की, “भारताने ज्या तीन एअरबेसवर हल्ला केला आहे, त्या सर्व पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आहेत आणि भारतीय सीमेकडून १०० ते ३०० किमी अंतरावर आहेत. यापैकी एक रावळपिंडीजवळ आहे, जिथून व्हीआयपी उड्डाणे होतात. ते पुढे म्हणाले, “या एअरबेसवरून पाकिस्तानचे पंतप्रधान व इतर व्हीव्हीआयपी उड्डाणे करतात. इथे पाकिस्तानच्या हवाई दलाच्या वाहतूक विभागाचे मुख्यालय देखील आहे. दुसऱ्या बेसमध्ये मिसाईल स्टोरेज असून तिथे अण्वस्त्रसुद्धा आहेत. तिसऱ्या एअरबेसमध्ये फायटर जेट्स आहेत. त्यामुळे हे तिन्ही ठिकाणे पाकिस्तानच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. भारतीय लष्कर थेट त्यांच्या हृदयावर घाव घालत आहे.

हेही वाचा..

मार्को रुबियो यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या चर्चेत काय ठरलं ?

देवोलीनाने केली पाकिस्तानी ट्रोलर्सची बोलती बंद

भारत-नेपाळ सीमेवर सुरक्षा वाढवली

चारधाम यात्रेतील हेलिकॉप्टर सेवा बंद

पाकिस्तानच्या कारवायांविषयी ते म्हणाले, “पाकिस्तान ही एक रणनीती वापरत आहे. हे ड्रोन भारताच्या संरक्षण यंत्रणेमधील त्रुटी शोधण्यासाठी पाठवले जात आहेत. हे जाणून घेतल्यावर पाकिस्तान त्याच दिशेने मोठे हल्ले करू शकतो. मात्र, आपले वायुदल त्यांचे सर्व ड्रोन नष्ट करण्यास सक्षम आहे आणि हे आपण यशस्वीपणे करत आहोत. पाकिस्तानकडून भारतात पाठवले जाणारे प्रत्येक ड्रोन सुमारे ५०,००० डॉलर्स किमतीचे आहे. याशिवाय, गेल्या दोन रात्रीपासून पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक सेन्सर डेटाही गोळा करत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा