27.3 C
Mumbai
Sunday, November 8, 2026
घरविशेषदुर्घटनाग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही, फोटो आला समोर!

दुर्घटनाग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणीही, फोटो आला समोर!

सुरक्षा पथकाकडून बचावकार्य सुरु 

Google News Follow

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. या अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला आहे. अपघातग्रस्त विमान एअर इंडियाचे बी७८७ होते. विमानात २४२ लोक होते, ज्यात २ पायलट आणि १० केबिन क्रूचा समावेश आहे. आता या अपघाताबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील या विमानात होते.

विमानात प्रवास करत असताना विजय रुपाणी यांचा फोटो समोर आला आहे. एका महिलेने सेल्फी घेतला आहे, ज्यामध्ये विजय रुपाणी त्यांच्या पाठीच्या सीटवर बसल्याचे दिसत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय रुपानी यांच्या पत्नी अंजली बेन गेल्या सहा महिन्यांपासून लंडनमध्ये आहेत आणि रुपानी आज त्यांना परत आणण्यासाठी लंडनला रवाना झाले होते.

एअर इंडियाच्या या निवेदनात म्हटले आहे की, विमान गुरुवारी अहमदाबादहून लंडनला रवाना झाले होते. तथापि, गुरुवारी दुपारी १:३८ वाजता उड्डाण केल्यानंतर ५ मिनिटांनी, विमान एका निवासी भागात (मेघनी नगर) कोसळले. विमानाचे नेतृत्व कॅप्टन सुमित सभरवाल करत होते. त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर होते. कॅप्टन सुमित सभरवाल यांना ८२०० तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. त्यांच्या सह-वैमानिकाला ११०० तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे.

हे ही वाचा  :

अहमदाबाद विमानतळावरील फ्लाइट ऑपरेशन्स स्थगित

एअर इंडिया विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर!

विमान दुर्घटना : विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश नागरिक होते

पायलटने ‘मे-डे’ कॉल केला होता !

विजय रुपाणी कोण आहेत?

विजय रुपाणी हे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते. विजय रुपाणी यांचा जन्म रंगून येथे झाला, जो आता म्यानमारमधील यांगून म्हणून ओळखला जातो. राजकीय अस्थिरतेनंतर त्यांचे कुटुंब १९६० मध्ये गुजरातमधील राजकोट येथे स्थलांतरित झाले. रुपाणी शाळेत असतानाच आरएसएस शाखेत सामील झाले होते. त्यानंतर, ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपमध्ये सामील झाले. त्यांनी २०१४ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली आणि राजकोट पश्चिम येथून पोटनिवडणूक जिंकली. ते २००६ ते २०१२ पर्यंत राज्यसभेचे सदस्य देखील होते. विजय रुपाणी यांनी २०१६ ते २०२१ पर्यंत गुजरातचे १६ वे मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा