इराण आणि इस्रायलमधील तणाव आता उघड युद्धाकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी (१३ जून) पहाटे इस्रायलने “ऑपरेशन रायझिंग लायन” अंतर्गत इस्रायलची राजधानी तेहरानवर व्यापक हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इराणचे लष्करप्रमुख मेजर जनरल मोहम्मद बघेरी आणि इंटरनल रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) प्रमुख मेजर जनरल हुसेन सलामी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. जनरल मोहम्मद बघेरी यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणने केली आहे.
इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणची अधिकृत वृत्तसंस्था असलेल्या इस्लामिक रिपब्लिक न्यूज एजन्सीने यापूर्वी वृत्त दिले होते की, इराणच्या एलिट इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) चे प्रमुख हुसेन सलामी, गार्डचे आणखी एक वरिष्ठ अधिकारी आणि दोन अणुशास्त्रज्ञां मृत्युमुखी पडले आहेत. स्थानिक इराणी माध्यमांच्या वृत्तानुसार इराणचे उच्च लष्करी अधिकारी तसेच अनेक वरिष्ठ अणुशास्त्रज्ञांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.







