भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना १९३२ मध्ये खेळला गेला होता. त्या ऐतिहासिक सुरुवातीपासून आतापर्यंत या दोन संघांमध्ये १३६ कसोटी सामने खेळले गेले आहेत.
पण तुम्हाला माहिती आहे का? या ९३ वर्षांच्या कसोटी इतिहासात फक्त दोन फलंदाज असे आहेत, ज्यांनी भारत-इंग्लंड कसोटीत तिहेरी शतक (३००+) ठोकले आहे!
होय! एक इंग्लिश खेळाडू आणि एक भारतीय. चला जाणून घेऊया कोण आहेत हे महान खेळाडू…
१) ग्राहम गूच – ३३३ धावा (इंग्लंड)
-
सामना: २६ ते ३१ जुलै, १९९०
-
स्थळ: लॉर्ड्स
-
इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना दोन विकेट्सवर १४१ धावा केल्या होत्या.
-
कर्णधार ग्राहम गूच यांनी सलामीवीर म्हणून खेळाला सुरुवात केली आणि एलन लॅम्बसोबत ३०८ धावांची तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचली.
-
गूचने तब्बल ६२८ मिनिटं फलंदाजी करत ४८५ चेंडूंमध्ये ३३३ धावा ठोकल्या – यात ३ षटकार आणि ४३ चौकार होते.
-
लॅम्बने १८७ चेंडूत १३९ धावा, तर रॉबिन स्मिथने नाबाद १०० धावा केल्या.
-
इंग्लंडने आपली पहिली डाव ६५३/४ वर घोषित केला.
-
भारताच्या पहिल्या डावात रवी शास्त्री (१००) आणि कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (१२१) यांच्या खेळीने ४५४ धावा केल्या.
-
इंग्लंडने दुसरा डाव २७२/४ वर घोषित केला.
-
भारत दुसऱ्या डावात २२४ धावा करून बाद झाला आणि इंग्लंडने सामना २४७ धावांनी जिंकला.
२) करुण नायर – ३०३ धावा (भारत)*
-
सामना: १६ ते २० डिसेंबर, २०१६
-
स्थळ: चेन्नई
-
इंग्लंडने पहिल्या डावात ४७७ धावा केल्या.
-
प्रत्युत्तरात भारताने आपला डाव ७५९/७ वर घोषित केला – जो आजवरचा सर्वात मोठा स्कोअर आहे.
-
या डावात के.एल. राहुलने १९९ धावा (३११ चेंडू) आणि करुण नायरने नाबाद ३०३ धावा (३८१ चेंडू) केल्या.
-
नायरने ५६५ मिनिटं फलंदाजी करत ४ षटकार आणि ३२ चौकार खेचले.
-
इंग्लंडचा दुसरा डाव २०७ धावांवर संपुष्टात आला.
-
रविंद्र जडेजाने या डावात ७ बळी घेतले आणि भारताने सामना एक डाव आणि ७५ धावांनी जिंकला.
विशेष म्हणजे, करुण नायर सध्या सुरू असलेल्या इंग्लंड दौऱ्यातही भारतीय संघाचा भाग आहेत.







