24 C
Mumbai
Friday, December 26, 2025
घरविशेषमुंबईच्या खेळाडूंची किकबॉक्सिंग राज्य स्पर्धेत विजयी झेप!

मुंबईच्या खेळाडूंची किकबॉक्सिंग राज्य स्पर्धेत विजयी झेप!

किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबईने

Google News Follow

Related

ऑल महाराष्ट्र चिल्ड्रेन, कॅडेट, ज्युनियर आणि सीनियर किकबॉक्सिंग निवड स्पर्धा २०२५ ही स्पर्धा २६ ते २९ जून दरम्यान हिंजवडी, पुणे येथे पार पडली. या राज्यस्तरीय स्पर्धेत स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर संघाच्या खेळाडूंनी पॉईंट फाईट, लाईट कॉन्टॅक्ट, किक लाईट, लो किक, टीम पॉईंट फाईट व क्रिएटिव्ह फॉर्म या प्रकारांत दमदार कामगिरी करत एकूण २५ पदके पटकावली. यामध्ये ८ सुवर्ण, ९ रौप्य व ८ कांस्य पदकांचा समावेश होता.

या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व अध्यक्ष उमेश मुरकर यांनी केले. आंतरराष्ट्रीय पंच व खेळाडू विघ्नेश मुरकर यांच्या कुशल मार्गदर्शनाचा लाभ संघाला झाला. प्रशिक्षक राहुल साळुंखे, साहिल बापेरकर, आशिष महाडिक, कशिश जैस्वार आणि आफताब खान यांनीही संघाच्या यशात मोलाचे योगदान दिले.

राज्य संघटनेचे अध्यक्ष निलेश शेलार यांनी मुंबईच्या विजेत्या खेळाडूंना आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

हे ही वाचा:

आंतरराष्ट्रीय ड्रग कार्टेलचा पर्दाफाश

ओबामा यांनी इराणला खूप काही दिलं, पण मी देणार नाही

गायीची कत्तल, शिर रस्त्यावर फेकले!

नेतन्याहूंना भ्रष्टाचार प्रकरणात दिलासा

राष्ट्रीय वाको किकबॉक्सिंग स्पर्धा १४ ते १९ जुलै २०२५ दरम्यान छत्तीसगड येथे तर ज्युनियर गटासाठी राष्ट्रीय स्पर्धा २६ ते ३० ऑगस्ट २०२५ दरम्यान चेन्नई, तामिळनाडू येथे पार पडणार आहे. मुंबईच्या खेळाडूंनी दाखवलेली ही उत्तुंग कामगिरी महाराष्ट्र किकबॉक्सिंगच्या इतिहासात एक नवीन प्रेरणादायी अध्याय ठरली आहे.

सुवर्ण पदक विजेते : ग्रीशम पटवर्धन –दुहेरी सुवर्ण,  आलोक ब्रीद, विघ्नेश परब,रोशन शेट्टी, विन्स पाटील, कुणाल सिंग, ध्रुव पालव,

रौप्य पदक विजेते:  अथर्व भंडारे (दुहेरी रौप्य), प्रज्ञेश पटवर्धन, सय्यद अहमद, नकुल रेले,  भूपेश वैती, विन्स पाटील, रोशन शेट्टी,

कांस्य पदक विजेते: राजीव राजेश (दुहेरी कांस्य), सय्यद अहमद, यथार्थ बुडमाला, मिहीर परब, विन्स पाटील, अथर्व भंडारे, अँड्रॉन क्रिस्तोफर.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा