कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील ब्रह्मवर येथे गायींच्या तस्करीचा एक प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या मधोमध एका गायीचे कापलेले शिर आणि कातडीचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली. स्थानिक रहिवासी २८ वर्षीय प्रदीपला रस्त्यावर गोमांस दिसले, त्यानंतर प्रदीपने पोलिसात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात असून आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे.
तक्रारीत म्हटले की, प्रदीप शनिवारी (२८ जून ) रात्री ११.३० वाजता कामावरून घरी परतत होता. प्रदीप कुंजल जंक्शनजवळ पोहोचला तेव्हा त्याला रिक्षा स्टँडजवळ रस्त्याच्या मधोमध एका गाईचे कापलेले शिर आणि कातडीचे तुकडे पडलेले आढळले. जवळ गेल्यावर त्याला आढळले की काही लोकांनी गाय कापली होती आणि गोमांस रस्त्यावर फेकले होते.
हे ही वाचा :
भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा विकास बघा…
नेतन्याहूंना भ्रष्टाचार प्रकरणात दिलासा
हिंदू महिलेवर बलात्कारानंतर बांगलादेशात मोठ्या प्रमाणात निदर्शने!
या प्रकरणी ब्रह्मवर पोलिसांनी कर्नाटक गोवंश हत्या प्रतिबंधक कायदा आणि पशुसंवर्धन कायद्याच्या कलम ४, ५ आणि १२ आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ३०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत. कर्नाटकात सार्वजनिक ठिकाणी गोमांस फेकण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे सर्व स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींवर कडक कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
