अदाणी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) ने सोमवारी जाहीर केले की कंपनीने १५ हजार मेगावॉट (MW) कार्यरत अक्षय ऊर्जा क्षमतेचा ऐतिहासिक टप्पा पार केला असून सध्या ही क्षमता १५,५३९.९ मेगावॉटपर्यंत पोहोचली आहे. ही कामगिरी भारतातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि जलद हरित ऊर्जा क्षमता वाढ दर्शवते. भारतातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा कंपनीने सांगितले की, तिच्या कार्यरत पोर्टफोलिओमध्ये ११,००५.५ मेगावॉट सौर ऊर्जा १,९७७.८ मेगावॉट पवन ऊर्जा आणि २,५५६.६ मेगावॉट हायब्रिड (पवन-सौर) ऊर्जा क्षमतेचा समावेश आहे.
अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी म्हणाले, “अदाणी ग्रीनने १५ हजार मेगावॉट अक्षय ऊर्जा क्षमतेचा टप्पा ओलांडल्याचे सांगताना आनंद होतो आहे. ही भारताच्या इतिहासातील सर्वात वेगवान आणि मोठ्या प्रमाणात झालेली हरित ऊर्जा निर्मिती आहे. बिलियनर उद्योगपती अदाणी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत लिहिले, “खावडाच्या वाळवंटी प्रदेशापासून ते जगातील टॉप १० ग्रीन पॉवर उत्पादकांमध्ये समावेश होईपर्यंतचा हा टप्पा केवळ आकड्यांमध्ये व्यक्त होणारा नाही, तर तो आपल्या ग्रहासाठी असलेल्या वचनबद्धतेचे आणि भारताच्या हरित पुनरुत्थानाच्या संकल्पाचे प्रतीक आहे.”
हेही वाचा..
नेतन्याहूंना भ्रष्टाचार प्रकरणात दिलासा
मुलीच्या मृत्युचा बदला घेण्यासाठी तो ट्रकचालकांना मारत असे!
ओमानच्या आखातात तेलवाहू जहाजाला आग, भारतीय नौदल मदतीला धावले!
AGEL ही भारतातील पहिली आणि एकमेव अक्षय ऊर्जा कंपनी आहे जिने मुख्यत्वे ग्रीनफील्ड प्रकल्पांद्वारे ही ऐतिहासिक कामगिरी साधली आहे. AGEL चे सीईओ आशीष खन्ना म्हणाले, “१५,००० मेगावॉटचा टप्पा पार करणे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. ही यशस्वीता आमच्या टीमच्या अथक मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ आहे. हे आमच्या प्रवर्तकांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाशिवाय आणि गुंतवणूकदार, ग्राहक, सहकारी व भागीदारांच्या अविरत पाठिंब्याशिवाय शक्य झाले नसते. ते पुढे म्हणाले, “गौतम अदाणी यांची अदाणी समूहाला जागतिक अक्षय ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर नेण्याची महत्त्वाकांक्षा आम्हाला प्रेरणा देते. यामध्ये आम्ही दाखवून दिले आहे की स्वच्छ ऊर्जा मोठ्या प्रमाणावर आणि जलद गतीने वितरित केली जाऊ शकते. AGEL आता नवकल्पना आणि कार्यक्षमतेसाठी नवीन मानके स्थापन करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
AGEL चे सध्या १५,५३९.९ मेगावॉट कार्यरत पोर्टफोलिओ सुमारे ७.९ दशलक्ष (७९ लाख) घरांना वीजपुरवठा करू शकते. त्यांच्याकडून उत्पादित होणारी स्वच्छ ऊर्जा भारतातील १३ विविध राज्यांमध्ये वीजपुरवठा करू शकते. AGEL चे ऑपरेशनल पोर्टफोलिओ पूर्वोत्तर भारत संपूर्णपणे अक्षय ऊर्जेने प्रकाशमान करू शकते. ही कामगिरी भारताला मोठ्या प्रमाणात आणि वेगाने स्वच्छ व परवडणारी ऊर्जा पुरवण्याच्या AGEL च्या १० वर्षांच्या प्रवासाशी संबंधित आहे.
खन्ना म्हणाले, “आमचे ध्येय २०३० पर्यंत अक्षय ऊर्जा क्षमतेला ५०,००० मेगावॉटपर्यंत नेणे आणि भारत व जगाला टिकाऊ ऊर्जा उपाय प्रदान करण्याच्या आमच्या मिशनशी पूर्णतः बांधील राहणे हे आहे. अदाणी ग्रीन एनर्जी सध्या गुजरातमधील कच्छच्या खावडा परिसरात ३०,००० मेगावॉट क्षमतेचा जगातील सर्वात मोठा अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारत आहे. ५३८ चौ. किमी क्षेत्रफळावर पसरलेला हा प्रकल्प पॅरिस शहरापेक्षा पाचपट मोठा असून तो अंतराळातूनही दिसू शकतो.
या प्रकल्पाचे पूर्णत्व झाल्यानंतर तो जगातील सर्व ऊर्जा स्रोतांमधील सर्वात मोठा पॉवर प्लांट असेल. सध्या AGEL ने खावडामध्ये ५,३५५.९ मेगावॉट अक्षय ऊर्जा क्षमतेचे उत्पादन सुरू केले आहे. खावडामध्ये होणारी ही जलद प्रगती, २०३० पर्यंत भारताचे ५०० गीगावॉट गैर-जीवाश्म इंधन क्षमतेचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी AGEL च्या वचनबद्धतेचा ठोस पुरावा आहे.
