न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा आक्रमक सलामीवीर फिन अॅलन १४ जुलैपासून झिम्बाब्वेत सुरू होणाऱ्या टी२० त्रिकोणी मालिकेतून बाहेर पडला आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या मेजर लीग क्रिकेट (MLC) 2025 स्पर्धेत सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सकडून खेळताना त्याच्या पायाला दुखापत झाली.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड (NZC) ने सांगितलं की, “एलनच्या दुखापतीची गंभीरता आणि पुनरागमनाची तारीख ही तो न्यूझीलंडला परतल्यानंतर आणि तज्ज्ञ सल्ल्यानंतर ठरेल. त्याच्या बदली खेळाडूची घोषणा लवकरच केली जाईल.”
२६ वर्षीय फिन अॅलनने युनिकॉर्न्सकडून ९ सामन्यांत ३३३ धावा केल्या असून तो सध्या या हंगामातील पाचव्या क्रमांकाचा टॉप स्कोअरर आहे. वॉशिंग्टन फ्रीडमविरुद्ध त्याने जबरदस्त १५१ धावांची खेळी केली होती.
न्यूझीलंडचा संघ गुरुवारी हरारेत दाखल होणार आहे. १६ जुलै रोजी त्यांचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवला जाणार आहे. त्याआधी, १४ जुलै रोजी झिम्बाब्वे वि. दक्षिण आफ्रिका असा मालिकेचा उद्घाटन सामना होणार आहे.
सर्व सामने हरारे स्पोर्ट्स क्लबवरच खेळवले जातील. फायनल सामना २६ जुलै रोजी टॉप-२ संघांमध्ये होईल.
मिचेल सॅन्टनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघात यंदा काही नवीन चेहरे आहेत. त्यामध्ये युवा बेव्होन जॅकब्सचा समावेश आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते.
हेही वाचा:
गुजरात घटना : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
राहुल गांधी पिकनिकसाठी आले आणि निघून गेले
तिरुमला देवस्थानचा कर्मचारी लपूनछपून जात होता चर्चमध्ये!
आंदोलकांना ‘शोधा आणि गोळ्या’ घाला!
ही मालिका हेड कोच रॉब वॉल्टर यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची पहिली मोठी मालिका आहे. वॉल्टर यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या मर्यादित षटकांच्या संघाचे प्रशिक्षक होते. संघात ल्यूक रॉन्की (बॅटिंग कोच), जॅकब ओरम (बोलिंग कोच) आणि जेम्स फॉस्टर (फोर्थ कोच) यांचा समावेश आहे.
📋 न्यूझीलंडचा त्रिकोणी मालिकेसाठी संघ:
मिचेल सॅन्टनर (कर्णधार), माइकल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, जॅकब डफी, जॅक फॉल्केस, मॅट हेनरी, बेव्होन जॅकब्स, अॅडम मिल्ने, डॅरिल मिचेल, विल ओ’रूर्के, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, टिम सिफर्ट, ईश सोढी.







