विंबलडन टेनिस स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत नोवाक जोकोविच यांनी इटलीच्या फ्लाविओ कोबोलीवर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र, सामना संपण्याआधी घडलेल्या एका घटनेने उपस्थित प्रेक्षकांची चिंता वाढवली. सामना जिंकण्याच्या अंतिम टप्प्यावर जोकोविच अचानक कोर्टवर कोसळले.
तथापि, काही क्षणांतच त्यांनी स्वतःला सावरत पुन्हा उभं राहत सामना पूर्ण केला आणि ६–७(६), ६–२, ७–५, ६–४ अशा फरकाने विजय मिळवला. हा विंबलडनमधील त्यांचा १०२ वा विजय ठरला.
सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जोकोविच म्हणाले,
“हे खूप विचित्र होतं. गवतावर खेळताना असं घडणं नवीन नाही, पण आता माझं शरीर पूर्वीसारखं राहिलेलं नाही. त्यामुळे ही घसरण उद्याच्या दिवशी त्रासदायक ठरू शकते. मी आशा करतो की पुढील २४ ते ४८ तासांत काही गंभीर न घडो.”
३८ वर्षीय जोकोविच यांचा हंगामातील एकूण रेकॉर्ड आता २६ विजय – ८ पराभव असा झाला आहे. ते २५ व्या ग्रँड स्लॅम विजयानंतर फक्त दोन पावलं दूर आहेत. जर त्यांनी यंदा हा किताब पटकावला, तर ते रोजर फेडररच्या आठ गवतवरील ग्रँड स्लॅम्सच्या विक्रमाशी बरोबरी करतील. तसेच, ओपन एरा इतिहासातील सर्वात वयोवृद्ध विजेते म्हणूनही त्यांची नोंद होईल.
हेही वाचा:
शशी थरूर यांनी आणीबाणीच्या क्रूर काळाची करून दिली आठवण
ठाकरे गटावर का भडकले उदय सामंत ?
हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे लोक घाबरले, म्हैसूरच्या रुग्णालयात लांब रांगा!
हरियाणात ४.४ रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले!
“माझ्या टीममध्ये जवळपास दहा लोक माझ्या फिटनेसवर आणि पुनर्वसनावर दररोज काम करतात. कधी कधी या सर्व प्रक्रियांचा थोडा कंटाळा येतो, पण सर्वोत्तम कामगिरीसाठी ही मेहनत आवश्यक आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.







