भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर सुरुवात होणार आहे. भारताला ही कसोटी जिंकून मालिकेत २–१ अशी आघाडी घ्यायची आहे. मात्र लॉर्ड्सवर एक वेळ अशीही आली होती, जेव्हा संपूर्ण संघ फक्त ३८ धावांतच गारद झाला होता!
ही घटना घडली होती २०१९ मध्ये, जेव्हा इंग्लंड आणि आयरलंड यांच्यात २४ ते २६ जुलैदरम्यान कसोटी सामना खेळला गेला होता.
त्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण केवळ ८५ धावांत संपूर्ण संघ बाद झाला.
आयरलंडकडून टिम मर्टाग याने सर्वाधिक ५ बळी घेतले, तर मार्क अडैरला ३ विकेट्स मिळाल्या.
इंग्लंडच्या संपूर्ण संघाला २३.४ षटकांत गारद केल्यानंतर, आयरिश फलंदाजांनीही पहिल्या डावात काहीसा नियंत्रण ठेवत २०७ धावा करत १२२ धावांची आघाडी घेतली.
मात्र दुसऱ्या डावात इंग्लंडने पुनरागमन करत ३०३ धावा केल्या.
जॅक लीच (९२) आणि जेसन रॉय (७२) यांनी शानदार खेळी केली.
लक्ष्य होतं फक्त १८२ धावांचं.
पण आयरिश फलंदाज इंग्लंडच्या अनुभवी गोलंदाजांसमोर टिकाव धरू शकले नाहीत.
हेही वाचा:
ठाकरे गटावर का भडकले उदय सामंत ?
हृदयविकाराच्या वाढत्या घटनांमुळे लोक घाबरले, म्हैसूरच्या रुग्णालयात लांब रांगा!
ज्ञानाचे अमृतकुंभ असे माझे गुरू डॉ. भटकर, डॉ. माशेलकर!
१५.४ षटकांत आयरलंड केवळ ३८ धावांत गारद झाला!
जेम्स मॅक्कलम याने सर्वाधिक ११ धावा केल्या. इतर कोणताही फलंदाज दहाच्या आतही पोहोचला नाही.
क्रिस वोक्स याने ७.४ षटकांत १७ धावांत ६ बळी, तर स्टुअर्ट ब्रॉड याने ८ षटकांत १९ धावांत ४ बळी घेतले आणि इंग्लंडने सामना सहज जिंकला.







