24 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरविशेषप्राथमिक अहवालात धक्कादायक खुलासा; टेक-ऑफनंतर एअर इंडियाची दोन्ही इंजिन बंद

प्राथमिक अहवालात धक्कादायक खुलासा; टेक-ऑफनंतर एअर इंडियाची दोन्ही इंजिन बंद

१५ पानांचा अहवाल आला समोर

Google News Follow

Related

एअर इंडियाच्या बोईंग 787-8 विमानाच्या १२ जून रोजी अहमदाबादजवळ झालेल्या दुर्घटनेवर एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (AAIB) १५ पानांचा प्राथमिक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

अहवालानुसार, टेक-ऑफनंतर काही सेकंदातच विमानाची दोन्ही इंजिन अचानक बंद झाली होती. इंजिन १ आणि इंजिन २ चे इंधन कट-ऑफ स्विच ‘रन’ वरून ‘कट ऑफ’ स्थितीत एकाच सेकंदात गेले.

AAIB ने सांगितले की, अपघातग्रस्त विमानाच्या दोन्ही इंजिनने सुरुवातीला जोर कमी झाल्यानंतर क्षणभर सावरायचा प्रयत्न केला, मात्र शेवटी ते स्थिर राहू शकले नाहीत. या अपघातात २६० लोकांचा मृत्यू झाला.

विमानाचे अवशेष ड्रोन फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

चक्रासन का आहे संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर?

तरुणांसाठी सुवर्णसंधी! अकोल्यात १५ जुलैला ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’

“उत्क्रांती नव्हे, ही आरोग्य क्रांती आहे” – गौतम अदानी

१७ सप्टेंबर, मोदींचा वाढदिवस ‘सेवा दिवस’ की ‘सेवा निवृत्ती’ दिवस?

तांत्रिक तपशील:

  • विमानाने टेक-ऑफनंतर १८० नॉट्स (IAS) कमाल वेग गाठला, आणि त्याच वेळी दोन्ही इंजिनचे इंधन स्विच ‘रन’ वरून ‘कट ऑफ’ झाले.
  • दोन्ही इंजिन एकमेकांनंतर फक्त एक सेकंदाच्या अंतराने बंद झाली.
  • यामुळे इंजिनची एन १ आणि एन २ गती कमी झाली कारण इंधनाचा पुरवठा बंद झाला.

पायलट एकमेकांशी काय बोलले?

कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डिंगमध्ये एका पायलटने दुसऱ्या पायलटला विचारले, “का कट-ऑफ केलं?” यावर दुसऱ्या पायलटने सांगितले की, त्याने असं काही केलं नाही.

या संभाषणामुळे तांत्रिक बिघाड किंवा पायलटमधील संवादातील गैरसमजाविषयी शंका निर्माण झाली आहे.

एअरपोर्टच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये टेक-ऑफनंतर लगेचच Ram Air Turbine (RAT) बाहेर येताना दिसली.

विमानाने हवेत पुरेशी झेप घेण्यापूर्वीच उंची गमवायला सुरुवात केली आणि विमानतळाच्या भिंतीच्या पलीकडे जाण्याआधीच कोसळले.

अहवालानुसार, फ्लाइट पथाजवळ कोणतीही मोठी पक्ष्यांची हालचाल नव्हती, त्यामुळे पक्षी धडकण्याची शक्यता सध्या नाकारण्यात आली आहे.

पुढील तपास:

  • सध्या बोईंग 787-8 किंवा GE GEnx-1B इंजिन ऑपरेटर्स व उत्पादकांना कोणतीही तातडीची शिफारस करण्यात आलेली नाही.
  • विमानातील Extended Airframe Flight Recorder (EAFR) ला मोठे नुकसान झाले असून पारंपारिक पद्धतीने डेटा काढता आलेला नाही.

ही दुर्घटना लंडनला जाणाऱ्या फ्लाइटची होती. टेक-ऑफनंतर काही सेकंदात अहमदाबादच्या BJ मेडिकल कॉलेज हॉस्टेल इमारतीवर कोसळल्याने २६० लोकांचा मृत्यू झाला होता, त्यात २४१ प्रवासी व क्रू सदस्य आणि जिथे विमान कोसळले तेथील १९ लोक होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा