आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे. दररोज नव्या आव्हानांना सामोरे जात असताना, शरीरालाही योग्य पोषणाची आवश्यकता असते. चांगले आरोग्य मिळवण्यासाठी संतुलित आणि पोषक आहार आवश्यक आहे. अशा वेळी निसर्गाने आपल्याला अनेक पर्याय दिले आहेत, त्यापैकी एक म्हणजे चिया सीड – हे छोटेसे बीज अनेक प्रकारे उपयोगी आहे.
अमेरिकेच्या नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननुसार, चिया बीजाचे वैज्ञानिक नाव साल्व्हिया हिस्पॅनिका आहे. हे बीज आकाराने लहान, आणि रंगाने पांढरे किंवा काळे असतात. त्यात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स यासारखे गुड फॅट्स भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या शरीराच्या विविध गरजा पूर्ण करतात.
हेही वाचा..
भारत आणि आइसलँडमध्ये सकारात्मक ऊर्जेची समान भावना
कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्यांचे पाय तोडले, ते सदानंदन मास्टर होतायत भाजपाचे खासदार!
आर्थर रोड जेलमध्ये गँगस्टर प्रसाद पुजारीवर हल्ला
पंतप्रधानांकडून राज्यसभेसाठी नामांकित चौघांना शुभेच्छा
चिया सीडचे मुख्य फायदे: मांसपेशींच्या देखभालीसाठी प्रोटीन – चिया सीडमध्ये असलेले प्रोटीन स्नायूंना (मसल्स) मजबूत ठेवते आणि त्यांची दुरुस्तीही करते. पचनासाठी फायबर – यातील डायटरी फायबर पचनक्रिया सुधारतो आणि बद्धकोष्ठतेपासून संरक्षण करतो. दृष्टी, त्वचा आणि मज्जासंस्थेसाठी व्हिटॅमिन्स – विटॅमिन A, B1, B2 आणि B3 यामुळे डोळे, त्वचा आणि नर्व्हस सिस्टीम निरोगी राहतात. ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स – हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी लाभदायक. हे मेंदूचे कार्य सुधारते आणि स्मरणशक्ती वाढवते.
खनिजद्रव्ये – कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि आयर्नमुळे हाडे मजबूत होतात. अँटीऑक्सिडंट्स – हानिकारक फ्री रॅडिकल्सपासून शरीराचे संरक्षण करतात, पेशींचे नुकसान टाळतात. ऊर्जा आणि ताकद – यात असलेले प्रोटीन व कार्बोहायड्रेट्स दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात. वजन नियंत्रण – पाण्यात भिजवलेले चिया सीड खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, त्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहते. त्वचा आणि केसांसाठी – यातील व्हिटॅमिन्स व मिनरल्स त्वचेला उजळ करतात आणि केसांना मजबुती देतात. डायबेटीस नियंत्रणासाठी – रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यात मदत होते. कॅन्सरपासून संरक्षण – विशेषतः कोलन कॅन्सर आणि स्तनाच्या कॅन्सरपासून बचाव करण्यास मदत करते.
किती प्रमाणात घ्यावे?
अमेरिकन डाएटरी गाईडलाइन्सनुसार, रोज ४८ ग्रॅमपेक्षा अधिक चिया सीड घेऊ नये. अति सेवन केल्यास अपचन, पोट फुगणे यासारख्या त्रासांचा सामना करावा लागू शकतो. मात्र, संतुलित प्रमाणात नियमित सेवन केल्यास चिया सीड आरोग्यासाठी एक वरदान ठरू शकते.







