आज सकाळी मातोश्री सदन, वडाळा इमारतीमध्ये एक अत्यंत दुर्दैवी आणि भयंकर घटना घडली. ११व्या मजल्यावर राहत असलेला एक रहिवासी लिफ्टशाफ्टजवळ उभा असताना, विकासकाच्या निष्काळजीपणामुळे आणि सुरक्षेच्या उपाययोजनांच्या अभावामुळे त्याचा तोल जाऊन तो थेट लिफ्टशाफ्टमध्ये कोसळला आणि जागीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
लिफ्ट अजून बसवलेली नव्हती आणि ती जागा पूर्णपणे उघडी होती. लिफ्ट बंद असूनही त्या परिसरात कोणतीही खबरदारी, अडथळा, सूचना फलक किंवा सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आलेली नव्हती. हे पूर्णपणे विकासकाची आणि संबंधित अधिकाऱ्यांची गंभीर बेजबाबदारी आणि दुर्लक्ष दर्शवते.
हे ही वाचा :
सेनाप्रमुखांनी साधला नव्या कमांड सुभेदार मेजर यांच्याशी संवाद
राज्यसभेसाठी नामांकित चौघांना नड्डा यांनी दिल्या शुभेच्छा
११ ऐतिहासिक इमारती, किल्ले बनणार पर्यटनस्थळे
कावड यात्रा आध्यात्मिक नाही तर शिस्तीचंही प्रतीक
या संदर्भात आज घडलेल्या घटनेचे फोटो आणि सामाविष्ट मृत्यू याचे दृश्य अत्यंत दु:खद आहेत. या मुद्द्यावर वारंवार पत्रव्यवहार करून SRA ला लेखी तक्रारी दिल्या आहेत, मात्र कोणतीही कारवाई झाल्याचे दिसले नाही.
दोन आठवड्यांपूर्वी SRA अधिकाऱ्यांनी साइटवर भेट दिली होती, पण त्यानंतरही काहीच कार्यवाही झाली नाही आणि आज हे भीषण अपघात घडून गेला.
हा अपघात नसून एक गंभीर गुन्हा आहे, आणि संबंधित विकासक व अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी स्थानिकांनी एकमुखी मागणी केली आहे.







