कोंडागावची कुस्तीपटू रंजीता कोरेटी हिने तैवानमध्ये पार पडलेल्या आशियन कॅडेट ज्यूडो चॅम्पियनशिप २०२५ मध्ये सुवर्ण पदक पटकावून संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला आहे.
छत्तीसगडच्या मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत रंजीता कोरेटीला या अद्वितीय यशासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिलं –
“कोंडागावच्या बिटिया रंजीता कोरेटी हिने तैपेईमध्ये झालेल्या आशियन कॅडेट ज्यूडो स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत व छत्तीसगडचं नाव उजळवलं आहे. हे यश संपूर्ण राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. आपल्या मुली आता जागतिक पातळीवर आपली प्रतिभा सिद्ध करत आहेत.”
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “राज्य बालकल्याण परिषदेचा, महिला व बाल विकास विभागाचा आणि समर्पित प्रशिक्षकांचा रंजीताच्या यशात मोलाचा वाटा आहे. कठोर मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर रंजीताने हे शिखर गाठले आहे.”
रंजीता कोरेटी ही आता लाखो मुलींसाठी एक प्रेरणा ठरली आहे. तिच्या यशाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले, “रंजीता कोरेटीला मनःपूर्वक शुभेच्छा. तिचं यश दाखवून देतं की योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळालं तर आपल्या मुली कुठलीही शिखरं गाठू शकतात. आमचं सरकार मुलींना सर्व पातळीवर सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहे.”
महिला व बाल विकास विभाग तसेच ITBPच्या मदतीने रंजीताला ज्यूडोचे प्रशिक्षण मिळाले. तिच्या खेळाची सुरुवात २०२१ मध्ये चंदीगढमध्ये झालेल्या ओपन नॅशनल ज्यूडो स्पर्धेपासून झाली. त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, भोपाळ येथे तिची निवड झाली.
रंजीताने राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके जिंकली आहेत –
-
२०२२: भोपाळ – ब्राँझ
-
२०२४: केरळ – सिल्व्हर, नाशिक – गोल्ड
-
पुणे ओपन नॅशनल: आसाम, तेलंगणा, महाराष्ट्र व दिल्लीच्या संघांवर मात करून सुवर्ण पदक
हेही वाचा:
कार्लसनचा माज गेला! प्रज्ञानंदकडून ऐतिहासिक पराभव
मुसळाधार पावसामुळे अमरनाथ यात्रा २४ तासांसाठी स्थगित
जय हो भारतमातेच्या लेकींचा! इंग्लंडमध्ये रचला इतिहास!
फिल्म इंडस्ट्रीने स्टंट कलाकारांना पाठबळ देणं गरजेचं
आंतरराष्ट्रीय स्तरावर २०२५ मध्ये युरोपियन कॅडेट कप मध्ये ५२ किलो वजनी गटात पाचवा क्रमांक मिळवला. त्यानंतर उझबेकिस्तानमध्ये आशियन कॅडेट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आणि अखेर तैपेईमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.
रंजीताच्या या विजयामुळे छत्तीसगडच्याच नव्हे, तर संपूर्ण भारताच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.







