आसामच्या दिसपूरमध्ये उल्फा (आय) दहशतवादी संघटनेने २०२४ च्या स्वातंत्र्य दिनादिवशी स्फोट घडवून आणण्याच्या कटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोठी कारवाई केली आहे. या कटात सहभागी असलेल्या आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्वातंत्र्य दिन २०२४ च्या दिवशी दिसपूरमध्ये आयईडी (इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव डिव्हाइस) लावण्याच्या कटात हे दोघे आरोपी थेट सहभागी होते. त्यांची ओळख डिब्रूगड जिल्ह्यातील रहिवासी भार्गव गोगोई आणि सुमू गोगोई अशी करण्यात आली आहे.
एनआयएच्या माहितीनुसार, या दोघांचा उद्देश आसाममधील विविध ठिकाणी स्फोट घडवून देशाच्या सुरक्षेला आणि अखंडतेला धोका पोहोचवण्याचा होता. यापूर्वी या प्रकरणात (आरसी-०३/२०२४/एनआयए-गुवाहाटी) एक आरोपी अटकेत होता, आता एकूण अटक झालेल्यांची संख्या तीन झाली आहे. एनआयएने सप्टेंबर २०२४ मध्ये हे प्रकरण दिसपूर पोलिसांकडून ताब्यात घेतले होते. त्यानंतर १३ जून रोजी एनआयएने उल्फा (आय) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या तीन सदस्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
हेही वाचा..
मुंबईत ईडीचे छापे: छंगूर बाबा संबंधित कथित धर्मांतर रॅकेट प्रकरणी चौकशी सुरू
पाकिस्तानात पावसामुळे ६० जणांचा मृत्यू
ईडीकडून रॉबर्ट वाड्रासह ११ जणांविरोधात आरोपपत्र
कर्नाटकमधील गडग जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’, पण हिंदू युवकावरच धर्मांतरणाची सक्ती
एनआयएच्या तपासात असे उघड झाले की हे आरोपी गुवाहाटीच्या दिसपूर लास्ट गेटसह आसाममधील विविध भागांमध्ये स्वातंत्र्य दिन सोहळ्याला व्यत्यय आणण्यासाठी आयईडी लावण्याच्या कटात सामील होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम-इंडिपेंडेंट (उल्फा-आय) या बंदी घालण्यात आलेल्या उग्रवादी संघटनेने आपल्या निवेदनात कबुली दिली होती की त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांना अडथळा आणण्यासाठी राज्यभरात १९ बॉम्ब प्लांट केल्याचे म्हटले होते. त्यांनी आपल्या निवेदनात असेही म्हटले होते की, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट करून त्यांनी आपली ताकद दाखवायची होती. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.







