महाराष्ट्र विधानसभा संकुलात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे, असे एएनआयने वृत्त दिले.
महाराष्ट्र विधानभवन येथे झालेल्या निदर्शनादरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणल्याबद्दल मुंबई पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. पडळकर आणि आव्हाड दोघांनीही त्यांच्या समर्थकांमधील वादाबद्दल सभागृहात नाराजी व्यक्त केली आहे.
गुरुवारी (१७ जुलै ) संध्याकाळी ही हाणामारी झाली. विधानसभा संकुलात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि ही घटना घडली. दरम्यान, या मारहाणीप्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले यांना पोलिसांनी अटक केली असून पोलिसांची पुढील कारवाई सुरु आहे.
हे ही वाचा :
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मुलाला वाढदिवशीच अटक!
संभाजी ब्रिगेड : विद्वेष, ब्राह्मणविरोध, इतिहासाच्या विकृतीकरणाचा प्रवास
दरम्यान, काँग्रेस विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या गुन्हाचा निषेध केला आहे. ते म्हणाले, विधानभवनातील कालची हाणामारीची घटना, काळीमा फासणारी आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्यासाठी विधानभवनात गुंड आणले गेले. कायदा-सुव्यवस्थेकडे गांभीर्याने पाहावे. ही स्थिती खराब झाली आहे.







