नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आशिष चौहान यांच्या जीवन चरित्रावर आधारित आणि त्यांच्या दैदिप्यमान कामगिरीच्या अनुषंगाने लिहिण्यात आलेल्या ‘स्थितप्रज्ञ’ या मराठी पुस्तकाचं अनावरण प्रकाशन नुकतंच मुंबई येथे करण्यात आले. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या परिसरात असणाऱ्या एनएसईच्या सभागृहात या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा आस्वाद उपस्थित असणाऱ्या मान्यवरांनी यावेळी घेतला. गुजरात राज्यातल्या अहमदाबाद जवळच्या एका छोट्याशा खेड्यातून नॅशनल स्टॉक एक्सचेंज पर्यंतचा आशिष चौहान यांचा सगळा प्रवास हा या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे. डॉ. मयूर शहा हे या पुस्तकाचे लेखक आहेत. मूळ पुस्तक हे इंग्रजी भाषेमध्ये आहे. त्याच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन करण्यात आले. मराठी अनुवाद हा अलका गांधी यांनी केलेला आहे.
हेही वाचा:
पंतप्रधान मोदी पुढील आठवड्यात ब्रिटनला भेट देणार!
लॉर्ड्सवर शौर्य अपुरं पडलं… जाडेजाने धाडस दाखवायला हवं होतं
संघ पदाधिकाऱ्याचा वेश घेवून वावरायचा छंगूर बाबा!
बदमाशांनी मुलीवर टाकले ‘ज्वलनशील पदार्थ’
या कार्यक्रमासाठी खास करून दलित चेंबर ऑफ कॉमर्स चे मिलिंद कांबळे, इस्कॉन गुरु गौरांग प्रभू, अभिनेता संजय दत्त, प्रसिद्ध उद्योगपती प्रशांत कारुळकर, विजय केडिया, माजी क्रिकेटवीर निलेश कुलकर्णी, धवल कुलकर्णी, अजिंक्य रहाणे, झी बिझनेसचे संपादक अनिल सिंघवी यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते. आशिष चौहान यांच्या या प्रवासाबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. अनेकांनी आशिष चौहान यांना त्यांच्या भावी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. आशिष चौहान यांचे शेअर बाजार, भारतीय अर्थकारण या क्षेत्रामध्ये असलेले योगदान या सगळ्याचा धांडोळा हा या पुस्तकाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे.







