संसदेत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सरकार ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा करण्यास पूर्णतः तयार आहे, असं स्पष्ट केलं गेलं आहे. मात्र, याच मुद्द्यावरून भाजपचे खासदार जगदंबिका पाल यांनी विरोधकांवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, सरकारने लोकसभा आणि राज्यसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा होण्यासाठी वेळ निश्चित केला आहे, पण विरोधकच चर्चा करू इच्छित नाहीत. खासदार पाल म्हणाले, “काल जेव्हा विरोधक लोकसभेत गोंधळ घालत होते, तेव्हा मी अध्यक्षांकडे स्पष्टपणे सांगितले की सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास आणि उत्तर देण्यास तयार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही सांगितले होते की आज अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली ‘बिझनेस अॅडव्हायझरी कमिटी’ची बैठक होणार आहे आणि आपण सर्व मुद्द्यांवर चर्चा करून त्यानुसार वेळ ठरवू.”
ते पुढे म्हणाले, “या बैठकीत ठरवले गेले की सरकारकडून ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा होईल. लोकसभेत १६ तास आणि राज्यसभेत ९ तास ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा होईल. मी विचारतो, मग विरोधकांनी गोंधळ का घालायचा? गोंधळ घालणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे का? जेव्हा सरकार म्हणत आहे की आम्ही प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करू, आणि तरीही राहुल गांधी आरोप करत आहेत की त्यांना बोलू दिलं जात नाही. मी स्वतः अध्यक्षांकडे म्हटलं होतं की त्यांनी आपल्या सदस्यांना सुचवावं आणि सभागृह सुरळीत चालू द्यावं.” बिहारमध्ये सुरू असलेल्या SIR (स्पेशल इन्क्वायरी रिपोर्ट) प्रकरणावरही, जगदंबिका पाल यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, “जेव्हा सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे, तेव्हा विरोधकांनी नोटीस द्यावी. पण सर्व मुद्द्यांवर एकत्र चर्चा होऊ शकत नाही. ‘ऑपरेशन सिंदूर’ असो, SIR असो किंवा इतर कोणताही मुद्दा, यावर निर्णय बिझनेस अॅडव्हायझरी कमिटी घेते आणि सरकार सर्व बाबींवर चर्चा करण्यास तयार आहे.”
हेही वाचा..
गिलगित-बाल्टिस्तानमध्ये पूराचा कहर
खरीप हंगामात पेरणीचं क्षेत्रफळ वाढलं !
खरे गुन्हेगार शोधा… अबू आझमी यांचा सल्ला
भारतीय संविधानातील अनुच्छेद ६७ (अ) म्हणजे काय?
माहिती अशी आहे की संसदच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीची बैठक झाली होती, ज्यात विविध विधेयकांवर आणि महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वेळ निश्चित करण्यात आला. ‘ऑपरेशन सिंदूर’वर लोकसभेत १६ तास आणि राज्यसभेत ९ तास चर्चा होणार आहे ‘भारतीय डाक विधेयक’वर लोकसभेत ३ तास चर्चा होणार आहे.







