लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिवस साजरा करत काल (२२ जुलै) भाजपा बोरिवली पूर्व व पश्चिम विधानसभेच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचे आयोजन बोरिवली पश्चिम मंडल तसेच बोरीवली पूर्व मंडळा तर्फे करण्यात आले होते.
भाजपा कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी रक्त दान हे श्रेष्ठ दान हे खरे करून दाखवत रक्तदान शिबिरात एकंदर २५० पिशव्या रक्त बोरीवली ब्लड बँकेच्या सौजन्याने संकलन करून खऱ्या अर्थाने सेवा दिवस साजरा करूनकार्यक्रम यशस्वी केला. आजच्या या बोरिवली मंडलांतर्फे आयोजित उपक्रमा अंतर्गत पूर्व खासदार जनसेवक गोपाळ शेट्टी तसेच स्थानिक आमदार संजय उपाध्याय यांनी सर्व ठिकाणी आपली उपस्थिती दिली व रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरित करत त्यांनी दिलेल्या या सामाजिक योगदानाबद्दल अभिनंदन व धन्यवाद दिले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बोरिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष नैनेश शाह, बोरीवली पूर्व मंडळ अध्यक्ष देव सिंग, सुरेखा ठोके,सुरेंद्र गुप्ता सोबत सर्व वॉर्ड अध्यक्ष श्रेया प्रभू,शेखर अहिरे, रचित जैन, धर्मवीर ठाकूर, योगेश मकवाना व सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदान शिबिराचे प्रमुख आयोजक महेश राऊत यांनी रक्तदान शिबिर यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
हे ही वाचा :
काजोल आणि ट्विंकल खन्ना जोडी करणार धमाल
काळा वेलदोडा : चव, सुगंध आणि आरोग्याची साथीदार
गोव्यात पर्यटकांच्या संख्येत वाढ
बाली आणि रावण यांच्यातील एक विस्मयकारक भेट







