32 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरक्राईमनामागाझियाबादमध्ये राहात होता बनावट राजदूत!

गाझियाबादमध्ये राहात होता बनावट राजदूत!

आलिशान गाड्या, पंतप्रधानांसोबतचे मॉर्फ केलेले फोटो सापडले

Google News Follow

Related

उत्तर प्रदेश एसटीएफच्या नोएडा युनिटने गाझियाबादच्या कवी नगर पोलिस स्टेशन परिसरात चालणाऱ्या बेकायदेशीर दूतावासाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात एसटीएफने हर्षवर्धन जैन याला अटक केली आहे. अटक केलेला आरोपी हा गाझियाबादच्या कवी नगर परिसरातील रहिवासी आहे.

एसटीएफच्या नोएडा युनिटकडून मिळालेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन केबी ३५ कविनगर येथे घर भाड्याने घेऊन बेकायदेशीरपणे वेस्ट आर्क्टिक दूतावास चालवत होता. तो स्वतःला वेस्ट आर्क्टिका, सबोरगा, पौलविया, लोडोनिया इत्यादी देशांचा राजदूत म्हणवून घेत असे. आरोपी डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेल्या वाहनांमधून प्रवास करत होता. (सामान्यतः विदेशी दूतावास, वाणिज्य दूतावास आणि राजनयिक यंत्रणा संबंधित वाहनांचा वापर करतात)

नोएडाच्या एसटीएफ युनिटने हे प्रकरण सोडवण्यासाठी विविध केंद्रीय एजन्सींशी संपर्क साधला आणि कारवाई केली. केंद्रीय एजन्सींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, एसटीएफच्या अधिकाऱ्यांनी २२ जुलै रोजी या परिसरात छापा टाकला आणि जैनला अटक केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीने भोळ्या लोकांना प्रभावित करण्यासाठी आणि स्वतःला एक शक्तिशाली राजनयिक म्हणून सादर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि विविध राष्ट्रप्रमुखांसह जागतिक नेत्यांचे मॉर्फ केलेले फोटो वापरले.

तपासात असे दिसून आले की हर्षवर्धन जैन हा प्रामुख्याने परदेशातील व्यवसाय सौदे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन व्यक्ती आणि कंपन्यांना फसवत होता. त्याने बनावट कंपन्यांद्वारे हवाला नेटवर्क चालवल्याचा आरोपही केला जात आहे. चौकशीदरम्यान हर्षवर्धनने एसटीएफला सांगितले की तो अनेक वर्षांपासून देश आणि परदेशात लोकांना नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली दलाली करत आहे.
हे ही वाचा  : 
छाप्यादरम्यान एसटीएफने डिप्लोमॅटिक नंबर प्लेट असलेली चार वाहने, लहान राष्ट्रांचे १२ राजनैतिक पासपोर्ट, परराष्ट्र मंत्रालयाचा शिक्का असलेले बनावट दस्तऐवज, दोन बनावट पॅन कार्ड, वेगवेगळ्या कंपन्यांचे १२ घड्याळे, वेगवेगळ्या देशांचे आणि कंपन्यांचे ३४ टपाल तिकिटे, २ बनावट प्रेस कार्डे, ४४.७ लाख रुपये रोख, अनेक देशांचे आणि अनेक कंपन्यांचे परकीय चलन दस्तऐवज इ, १८ डिप्लोमॅटिक नंबर प्लेट्स जप्त केले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा