रशियाच्या अमूर प्रांतात गुरुवारी एएन-२४ प्रकारचे एक विमान दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेत विमानातील सर्व ४९ प्रवाशांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये ५ लहान मुले आणि ६ क्रू सदस्यांचाही समावेश आहे. हे विमान ब्लागोवेशचेंस्क येथून उड्डाण करून रशिया-चीन सीमेवर असलेल्या टिंडा दिशेने जात होते. मात्र लँडिंगच्या काही वेळ आधीच विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. ही फ्लाइट सायबेरियातील अंगारा एअरलाईन्सद्वारे चालवली जात होती.
रशियन सरकारी वृत्तसंस्था ‘तास’च्या माहितीनुसार, उड्डाणादरम्यानच विमानाला आगीचा झटका बसला आणि ते रडारवरून गायब झाले. यानंतर रेस्क्यू हेलिकॉप्टर्सनी टिंडाच्या सुमारे १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका दुर्गम डोंगरावर जळालेल्या विमानाच्या अवशेषांचा शोध लावला. अमूर सेंट्रल सिव्हिल डिफेन्स अँड फायर सेफ्टीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, “जेव्हा एमआय-८ शोधक हेलिकॉप्टरने दुर्घटनास्थळी उड्डाण केले, तेव्हा एकही प्रवासी जिवंत आढळला नाही.
हेही वाचा..
राहुल गांधींच्या वक्तव्याने पाकमधील दहशदवादी आनंदित
सांगली ड्रग्स फॅक्टरी प्रकरण : केमिकल पुरवठादाराला गुजरातमधून केली अटक
पाकिस्तानी पासपोर्ट अजूनही सर्वात दुर्बल
जो लालचामुळं धर्मांतर करतो, तो देशही विकू शकतो
प्राप्त माहितीनुसार, विमान कोसळताच त्याला भीषण आग लागली. एका प्रवक्त्याने सांगितले, “रेस्क्यू ऑपरेशन खूपच अवघड झाले आहे, कारण ही दुर्घटना एक तीव्र आणि दुर्गम उतारावर घडली आहे. या भागातील भौगोलिक परिस्थितीदेखील मदतकार्यात अडथळा ठरत आहे. दाट टायगा जंगल आणि दलदलीची जमीन यामुळे बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, विमान अपघाताच्या अगोदर कोणताही ‘डिस्ट्रेस सिग्नल’ पाठवलेला नव्हता. त्यामुळे अचानक काय घडले याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. प्राथमिक अहवालांनुसार, एएन-२४ विमान टिंडा विमानतळावर दुसऱ्यांदा उतरण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा ते रडारवरून गायब झाले. घटनेची माहिती मिळताच रोसावियात्सिया संस्थेचे एक विमान आणि अनेक बचाव पथके तातडीने त्या परिसरात पाठवण्यात आली.
अमूर प्रांताचे गव्हर्नर वासिली ऑर्लोव्ह यांनी सांगितले की, “विमानाचा शोध घेण्यासाठी सर्व आवश्यक साधने आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. सुदूर पूर्व वाहतूक प्रॉसिक्यूटर कार्यालयाने या अपघाताच्या तपासास सुरुवात केली आहे. ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतरच अपघाताचे खरे कारण समजू शकेल.







