केरळमधील कन्नूरमधून धक्कादायक बातमी येत आहे. २०११ मध्ये सौम्या या २३ वर्षीय महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेला आरोपी गोविंदाचामी कन्नूर मध्यवर्ती कारागृहातून पळून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदाचामी तुरुंगाच्या कोठडीचे बार कापून तेथून पळून गेला. पोलिसांनी आरोपी गोविंदाचामीच्या फोटोसह एक वॉन्टेड पोस्टर देखील जारी केले आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
२३ वर्षीय महिलेवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी गोविंदाचामी उर्फ चार्ली थॉमस याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती (सौम्या बलात्कार आणि हत्या प्रकरण). १ फेब्रुवारी २०११ रोजी सौम्यावर एर्नाकुलम ते शोरानूर प्रवासी ट्रेनमध्ये प्रवास करताना हल्ला झाला होता.
फरार आरोपी गोविंदाचामीचे मागील रेकॉर्ड खराब असून त्याच्यावर चोरी आणि दरोड्या सारखी अनेक गुन्हे दाखल आहेत. फेब्रुवारी २०११ मध्ये २३ वर्षीय महिलेवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी केरळ पोलिसांनी त्याला अटक केली.
शुक्रवारी (२५ जुलै) पहाटे कन्नूर मध्यवर्ती कारागृहातून आरोपी गोविंदाचामी पळून गेला. सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास तो त्याच्या कोठडीतून बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध तीव्र केला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गोविंदाचामीला तुरुंगातील उच्च सुरक्षा कक्षात ठेवण्यात आले होते.
मात्र, तरीही तो कोठडीचे लोखंडी बार कापून तुरुंगातून पळून गेला. कन्नूर टाउन पोलिसांनी माहिती दिली की, आरोपी तुरुंगातून पळून जाण्याच्या घटनेशी संबंधित माहिती अद्याप समोर येत आहे. व्यापक शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे आणि अधिक माहितीची वाट पाहत आहे.
हे ही वाचा :
इंदिरा गांधींचा विक्रम मोडून नरेंद्र मोदी हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ राहिले ‘पंतप्रधान’
सिगारेट न दिल्याने पठ्ठयानी दुकानदारावर पिस्तूल रोखली, मिर्झापूर मधील घटना
भारत-ब्रिटन करारामुळे राज्याच्या पिकाला व परंपरेला जागतिक बाजारपेठेची नवी दारे खुली!
चेहऱ्यावर शोभणाऱ्या पांढऱ्या मिशा, भरीव देहयष्टी लाभलेले WWE कुस्तीपटू हल्क होगन यांचे निधन
पोलिसांनी वॉन्टेड पोस्टर जारी केले
पोलिसांनी आरोपी गोविंदाचामी यांचे एक पोस्टर देखील जारी केले आहे आणि लोकांना आवाहन केले आहे की जर त्यांना त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाली तर त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवावे.







