काँग्रेस पक्षाला देशातील कोणत्याही व्यवस्थेवर विश्वास नाही, मग त्यांचा विश्वास नेमका आहे कशावर असा सवाल भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एका वाहिनीवर बोलताना विचारला आहे. त्यांनी यासंदर्भात आपले म्हणणे नेहमीच्या त्यांच्या शैलीत मांडले.
सुधांशू त्रिवेदी यांनी नंतर हे म्हणणे एक्सवर पोस्टही केले. त्यात ते लिहितात, काँग्रेस पक्ष म्हणतो की त्यांना निवडणूक आयोगावर विश्वास नाही. त्यांना माध्यमांवर विश्वास नाही. सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित करून त्यांनी लष्करावर विश्वास नसल्याचे दाखवले. त्यांना हवाई दलावरही विश्वास नाही, कारण त्यांनी बालाकोट एअर स्ट्राईकवर शंका घेतली.
त्रिवेदी म्हणतात की, जेव्हा ऑपरेशन सिंदूर झाले, तेव्हाही त्यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयावर विश्वास दाखवला नाही. जेव्हा हिंडनबर्गचा मुद्दा आला, तेव्हा त्यांनी सेबीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं. त्यांनी म्हटलं की, एलआयसी विकली गेली, पण एलआयसीने आपल्या इतिहासातील सर्वाधिक नफा मिळवला आहे. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाविषयी सांगितले की ती विकली गेली, पण वास्तवात, स्टेट बँकेचा मागील तिमाहीतला नफा देशातील सर्व खासगी आणि सरकारी बँकांमध्ये सर्वाधिक आहे.
हे ही वाचा:
भारतीय पुरुष हॉकी संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
अश्लील सामग्री प्रसारित करणाऱ्या २५ ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी
ऋषभ पंतची क्षमता जबरदस्त आहे, त्याचा जोश अतुलनीय आहे: शार्दुल ठाकूर
कमल हासनसह चार सदस्यांनी राज्यसभेत घेतली शपथ
कोविड लसीकरण आलं, तेव्हा देखील त्यांनी लसीवर विश्वास नाही असं म्हटलं, असे म्हणत त्रिवेदी म्हणाले की, हा केवळ शंका-आधारित दृष्टिकोन आहे का? की त्यांच्या मानसिकतेत भारताच्या प्रत्येक गोष्टीबद्दल अविश्वास पसरवण्याची एक वृत्ती रुजली आहे?
लसी पासून निवडणूक आयोगापर्यंत, लष्करापासून माध्यमांपर्यंत, सेबीपासून एलआयसीपर्यंत शेवटी काँग्रेसला नेमका विश्वास कोणावर आहे? इतकंच नव्हे तर, काँग्रेस पक्षाला भारताचं मत मांडण्यासाठी परदेशात गेलेल्या त्यांच्या स्वतःच्या खासदारांवर आणि नेत्यांवरही विश्वास नाही, असेही त्रिवेदी म्हणाले.







