त्रिपुराच्या सीमावर्ती भागात भारतातून माल तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बांगलादेशी तस्करांना बीएसएफ जवानांनी गोळ्या घालून ठार केले. वृत्तानुसार, तस्करांची ओळख झाकीर हुसेन मिल्लत, मोहम्मद यासीन लिटन आणि मोहम्मद अफसर अशी झाली आहे.
अहवालात म्हटले आहे की हे तिघेही कपड्यांसह विविध वस्तूंची तस्करी करायचे. २६ जुलै रोजी जेव्हा त्यांचा सीमेवर बीएसएफ जवानांशी सामना झाला तेव्हा त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी हल्ला केला आणि प्रत्युत्तरादाखल तिघांनाही गोळ्या घालण्यात आल्या.
त्यापैकी एकाचा (मोहम्मद यासीन लिटन) जागीच मृत्यू झाला तर दुसरा (झाकीर हुसेन मिल्लत) रुग्णालयात उपचारादरम्यान मरण पावला. तर तिसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनास्थळावरून १५ लाख रुपयांच्या औषधांचा साठा जप्त करण्यात आल्याचे बीएसएफ अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदी ‘शो’ नाहीत, ते विकासाचा ‘रोड शो’ आहेत!
होमगार्ड भरतीदरम्यान पडली बेशुद्ध, रुग्णवाहिकेतून नेताना झाला बलात्कार!
जगभरात पुन्हा वाजला पंतप्रधान मोदींचा डंका
अलिगडमध्ये दिवसाढवळ्या भाजप नेत्याची हत्या!
यानंतर कमांडंट स्तरावरील ध्वज बैठकही घेण्यात आली आणि बीजीबी अधिकाऱ्यांनी गोळीबाराबद्दल चिंता व्यक्त केली. परंतु आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे की भारत-बांगलादेश सीमेवर तस्करी खपवून घेतली जाणार नाही. शिवाय, तस्कर हिंसक झाले तेव्हा बीएसएफला स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला. त्रिपुरा पोलिस सहाय्यक महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) रणधीर देबबर्मा यांनी सांगितले की, तस्करीच्या प्रयत्नासंदर्भात दोन भारतीय तस्करांना अटक करण्यात आली आहे.







