केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी (२९ जुलै) पुष्टी केली की पहलगाम हल्ला करणारे तीनही लष्करी दहशतवाद्यांना ऑपरेशन महादेवमध्ये सुरक्षा दलांनी ठार मारले. “बैसरन खोऱ्यात निष्पाप नागरिकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर त्यांच्या धर्माबद्दल विचारून मारण्यात आले… लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाईत हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन दहशतवाद्यांना निष्क्रिय केले आहे,” असे संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत भाग घेताना गृहमंत्री शाह म्हणाले.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, २२ एप्रिलच्या हत्याकांडानंतर त्यांना आश्रय देणाऱ्यांनी तीनही दहशतवाद्यांची ओळख पटवली, ते सर्व पहलगाम हल्लेखोर असल्याचे सांगितले. लष्कराचा टॉप कमांडर सुलेमान शाह, अफगाण आणि जिब्रान, अशी त्यांची नावे आहेत.
गेल्या महिन्यात, परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद या दोन स्थानिकांना एनआयएने हल्लेखोरांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. “त्यांना (दहशतवाद्यांना) अन्न पुरवणाऱ्या लोकांना आधी ताब्यात घेण्यात आले होते. या दहशतवाद्यांचे मृतदेह श्रीनगरला आणल्यानंतर, आमच्या एजन्सींनी ताब्यात घेतलेल्यांनी त्यांची ओळख पटवली,” ते पुढे म्हणाले.
हे ही वाचा :
यात्रेकरूंनी भरलेल्या बसचा भीषण अपघात
नागकूपात दर्शनासाठी भाविकांची रांग
लोकसभेतील गोंधळावर अमित शाह यांचा संताप
बंगाली कुटुंबावर हल्ला केल्याचा ममता बॅनर्जींचा दावा पोलिसांनी फेटाळला!
लोकसभेत सतत घोषणाबाजी सुरू असताना, गृहमंत्री शाह विरोधकांवर टीका केल्याशिवाय राहू शकले नाहीत. “पहलगाम दहशतवाद्यांच्या मृत्युची बातमी ऐकून ते आनंदी होतील अशी मला अपेक्षा होती, पण त्याऐवजी ते त्याबद्दल आनंदी दिसत नाहीत,” असे ते म्हणाले. या कारवाईची माहिती देताना शाह म्हणाले की, सुरक्षा दलांना दहशतवाद्यांना देशाबाहेर जाऊ देऊ नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.







