टोरांटो येथील भारतीय महावाणिज्य दूतावासाने मंगळवारी एका निवेदनात सांगितले की कॅनडाच्या न्यूफाउंडलँड प्रांतात एक व्यावसायिक सर्वेक्षण विमान कोसळल्याने एक भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. स्थानिक वृत्तसंस्थांनुसार, ही दुर्घटना २६ जुलैच्या संध्याकाळी डियर लेक विमानतळाजवळ घडली.
मृत भारतीय नागरिकाचे नाव गौतम संतोष असल्याचे भारतीय दूतावासाने स्पष्ट केले असून, दूतावासाने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत मृताच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. ‘एक्स’वर लिहिलेल्या पत्रात, दूतावासाने म्हटले आहे, “या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती आपल्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. दूतावास कॅनडामधील दुःखी कुटुंबीयांशी आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्कात आहे व सर्व आवश्यक मदत पुरवत आहे.”
हेही वाचा..
भारत बनला अमेरिकेचा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यातदार
‘पाकिस्तानने गुडघे टेकल्यामुळेच शस्त्रसंधी’
पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला, तीनही दहशतवादी मारले!
मूळचे केरळचे रहिवासी असलेले संतोष, ब्रिटिश कोलंबियामधील डेल्टा येथे असलेल्या ‘किसिक एरियल सर्व्हे इन्क.’ कंपनीत कार्यरत होते, जी ‘पाइपर पीए-३१ नवाजो’ प्रकारचे विमान चालवते. यापूर्वी, रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस (RCMP) यांनी पुष्टी केली होती की या अपघातावेळी विमानात दोन जण होते, आणि दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. ब्रिटिश कोलंबियामधील किसिक जिओस्पेशियल अँड एरियल सर्व्हे कंपनीचे मालक अँड्र्यू नेस्मिथ यांनी सांगितले की, “या घटनेमुळे आम्ही स्तब्ध आणि दुःखी आहोत.
ते पुढे म्हणाले, “मृतांच्या कुटुंबीयांप्रती आणि त्यांच्या प्रियजनांप्रती आमच्या गाढ संवेदना आहेत. अपघातग्रस्त विमान ‘पाइपर नवाजो ट्विन-इंजिन’ प्रकाराचे होते, ज्यामध्ये एकावेळी आठ प्रवासी प्रवास करू शकतात. तथापि, नेस्मिथ यांनी या अपघातात मृत झालेल्या व्यक्तींची नावे तत्काळ जाहीर करण्यास नकार दिला आणि सांगितले की, “ही माहिती केवळ संबंधित अधिकाऱ्यांकडूनच दिली जाईल. कॅनडाच्या ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड (TSB) या घटनेची चौकशी करत आहे. अपघातानंतर, नेस्मिथ यांनी म्हटले की त्यांची कंपनी सर्वतोपरी सहकार्य करेल.







