केवळ एक सीटबेल्ट आणि एका सतर्क पोलिसाचे सूचनांचे पालन केल्यामुळे अंधेरी येथील एका भीषण अपघातात जोडप्याचे प्राण वाचले, ही घटना सध्या मुंबईकरांच्या मनात सुरक्षिततेबद्दल नव्याने जागृती निर्माण करत आहे.
बीकेसी परिसरातून अंधेरीकडे जात असताना गौतम रोहरा आणि त्यांच्या पत्नीचा गाडीवरील ताबा सुटून गाडी उलटली. गाडी दोनदा पलटी झाली, पण आश्चर्य म्हणजे त्यांना फक्त किरकोळ दुखापती झाली – कारण सीटबेल्ट लावलेला होता.

अपघाताच्या अवघ्या १५ मिनिटांपूर्वी, बीकेसीजवळ तैनात असलेल्या वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण क्षीरसागर यांनी त्यांची गाडी थांबवून, सीटबेल्ट न लावल्याबद्दल पत्नीला समजावले होते. त्यांनी दंड न करता, सीटबेल्टच्या सुरक्षिततेचे महत्व पटवून दिले. “दंड नको, तुमचे प्राण महत्त्वाचे,” या शब्दांनी प्रोत्साहित होऊन त्यांनी सीटबेल्ट लावला – आणि नेमकं तेच त्यांच्या जीवाचे रक्षण करणारे ठरले.
हे ही वाचा:
मौलाना साजिद रशिदी यांची जीभ कापणाऱ्याला १.५१ लाख रुपयांचे बक्षीस!
‘ऑपरेशन महादेव’: दोन हल्लेखोरांचे फोटो आले समोर!
पुतीन यांच्याकडे ५० नाहीतर केवळ १२ दिवस, नाहीतर निर्बंधांना सामोरे जा!
अपघातानंतर हे जोडपे तात्काळ बीकेसी वाहतूक चौकीत गेले आणि आपल्या जीवितरक्षणासाठी पोलिसांचे आभार मानले. त्यांनी प्रवीण क्षीरसागर यांना “पालक देवदूत” असे संबोधले. गौतम रोहरा यांनी ही कथा सोशल मीडियावर शेअर केली असून ती प्रचंड व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांनी मुंबई वाहतूक पोलिसांच्या दक्षतेचे आणि जबाबदारीचे कौतुक करताना “प्रत्येक सीटबेल्टमागे एक जीव सुरक्षित असतो” हा संदेश अधोरेखित केला आहे.
ही घटना नागरिकांना जागरूक राहण्याचा आणि लहान वाटणाऱ्या सवयींमुळे मोठा फरक पडू शकतो, हे शिकवणारी ठरली आहे.







