ऑपरेशन सिंदूरबाबत लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी ही मोहीम म्हणजे सरकारचा मीडियातील तमाशा होता, अशी टीका केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
प्रणिती शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. प्रणिती शिंदे सभागृहात म्हणाल्या की “ऑपरेशन सिंदूर हे नाव जरी देशभक्तीचं वाटत असलं तरी हा केवळ सरकारचा प्रसारमाध्यमांवरील तमाशा होता. या मोहिमेतून सरकारने काय सिद्ध केलं ते अद्याप कोणालाही समजलेलं नाही.”
खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, “ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकताना असं वाटतं की यात देशभक्ती आहे. मात्र, हा प्रसारमाध्यमांवर दाखवला गेलेला सरकारचा एक तमाशा होता. कारण या मोहिमेद्वारे आपण काय साध्य केलं, किती दहशतवाद्यांना पकडलं, शत्रूने आपली किती विमानं पाडली या हल्ल्याला कोण जबाबदारी होतं, यात कोणाची चूक होती, दहशतवादी कुठून आले, आपल्या नागरिकांना ठार मारून दहशतवादी कुठे पळून गेले, यापैकी सरकारला काहीच माहिती नाही. सरकारकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही.”
संसदेत ‘ऑपरेशन’ सुरू पण पेशंट बरा होईल ?
6-6-6 वॉकिंग रूटीन होत आहे वायरल! काय आहे वजन कमी करण्याच्या हा नवीन ट्रेंड
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक निवृत्तीपूर्वी एसीपी होणार
पिक विमा महागला; 1 रुपयात विमा बंद
“पंतप्रधानाना केले लक्ष्य”
काँग्रेसच्या खासदार म्हणाल्या, “सरकारकडे ऑपरेशन सिंदूरबाबत कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही आणि यांना शेजारी असलेल्या देशावर आक्रमण करायचंय, त्या नावाखाली निवडणुकीत लोकांची मतं घ्यायची आहेत. कोणी मेलं तरी यांना काहीच फरक पडत नाही. आपले पंतप्रधान आणि सरकार २४/७ (दिवसाचे २४ तास, आठवड्याचे सातही दिवस) निवडणुकांच्या मोडमध्ये असतात. आपल्या देशाची प्रतिमा याआधी इतकी कमकुवत कधीच झाली नव्हती. मात्र, या लोकांमुळे तसं घडलंय. कारण यांना प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करायचा आहे. माझी मोदींना विनंती आहे की, प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करणं थांबवा. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की त्यांनी त्यांची ‘मन की बात’ थांबवून ‘जन की बात’ करावी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची हिंमत दाखवावी.”
प्रणिती यांच्या या विधानानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.
त्या म्हणतात, भर संसदेत भारतीय सैन्याच्या शौर्याला तमाशा म्हणताना प्रणिती शिंदे यांना लाज वाटली नाही का? ज्यांच्या बळावर तुम्ही-आम्ही सगळे सुरक्षित आहोत, त्यांच्याबाबत अशी उपेक्षेची भाषा केली जात आहे. नको तिथे तुष्टीकरणाचं राजकारण करू नका.







