अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने बुधवारी (३० जुलै) इराणी पेट्रोलियम आणि पेट्रोकेमिकल उत्पादनांशी संबंधित महत्त्वपूर्ण व्यवहारांमध्ये सहभागी असलेल्या अनेक कंपन्यांवर बंदी घालण्यात आली, ज्यामध्ये भारतातील अनेक कंपन्यांचा समावेश आहे. जानेवारी २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान भारतीय कंपन्यांनी मिथेनॉल, टोल्युइन आणि पॉलीथिलीन सारखे पदार्थ आयात केल्याचे आढळून आले. या निर्बंधांमध्ये तुर्की, युएई, चीन आणि इंडोनेशिया येथील कंपन्यांनाही लक्ष करण्यात आले आहे.
बंदी घालण्यात आलेल्या भारतीय कंपन्यांमध्ये कांचन पॉलिमर्स, अल्केमिकल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, रमणिकलाल एस गोसालिया अँड कंपनी, ज्युपिटर डाई केम प्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबल इंडस्ट्रियल केमिकल्स लिमिटेड आणि पर्सिस्टंट पेट्रोकेम प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे.
या भारतीय कंपन्यांवर बंदी घालण्याची घोषणा करताना, डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने आरोप केला आहे की ते जाणूनबुजून इराणी पेट्रोलियम उत्पादनांच्या खरेदी आणि वितरणासाठी महत्त्वपूर्ण व्यवहारांमध्ये सहभागी आहेत, जे इराणवर लादलेल्या अमेरिकेच्या निर्बंधांचे थेट उल्लंघन आहे.
हे ही वाचा :
आता अमेरिका पाकिस्तानचे तेल काढणार
भारतावर २५ टक्के कर, ट्रम्प म्हणतात- आम्ही वाटाघाटी करत आहोत!
अलिबाग – राज्यस्तरीय ज्युनिअर लगोरी स्पर्धेत रायगड जिल्ह्याचा अव्वल नंबर
“या कंपन्यांनी एकत्रितपणे कोट्यवधी डॉलर्स किमतीचे इराणी मूळचे पेट्रोकेमिकल्स आयात केले आहेत. इराणच्या अस्थिर कारवायांसाठी अब्जावधी डॉलर्सचा बेकायदेशीर निधी निर्माण करणाऱ्या व्यवहारांमध्ये त्यांची भूमिका आहे,” असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले. तथापि, विभागाने म्हटले आहे की, “निर्बंधांचे अंतिम उद्दिष्ट शिक्षा करणे नाही, तर वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणणे आहे”. दरम्यान, अमेरिकेच्या कारवाईला प्रतिसाद म्हणून भारतीय कंपन्यांनी अद्याप सार्वजनिक निवेदने जारी केलेली नाहीत.







