न्यायालयाच्या निकालाचे स्वागत पण न्याय मिळण्यास बराच उशीर झाला. मात्र, अखेर न्याय मिळाला. युपीए सरकारच्या काळात तेव्हा मोठ्या प्रमाणात बॉम्बब्लास्ट होत होते. दहशतवादाला-आतंकवादाला कोणताही रंग नसतो, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, जेव्हा मालेगावमध्ये ब्लास्ट झाला तेव्हा त्यांनी म्हटले कि हा ‘भगवा दहशतवाद’ आहे आणि यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजच्या निकालात तेव्हाचे राजकारण-दिशाभूल करणाऱ्याला चपराक कोर्टाने दिली आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए विशेष कोर्टाने आज मोठा निकाल दिला. कोर्टाने या प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष सुटका केली. आरोपींविरुद्ध ठोस पुरावे नसून संशयाच्या आधारे दोषी ठरवता येत नसल्याचे कोर्टाने नमूद केले. त्यानुसार कोर्टाने भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितसह रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, अजय राहिरकर, सुधाकर धर द्विवेदी उर्फ शंकराचार्य आणि समीर कुलकर्णी या सर्वांची निर्दोष मुक्तता केली.
हे ही वाचा :
अमेरिका ३५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावतो
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका!
बांगलादेशमध्ये बीएनपी आणि एनसीपी समर्थकांमध्ये राडा
आता अमेरिका पाकिस्तानचे तेल काढणार
दरम्यान, न्यायालाच्या निकालाचे स्वागत करत उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हणाले, ‘भगवा दहशतवाद’ म्हणून त्यावेळी हिंदुत्वाला त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘हिंदू देशभक्त असतो, देशविघातक कारवाया करत नसतो’ हे आजच्या निकालाने सर्व स्पष्ट झाले आहे. झालेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि कुठल्याही दहशतवादाचे समर्थन आम्ही करत नाही.







