भाजपा खासदार जगदंबिका पाल यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही, ते फक्त थांबवण्यात आले आहे. आतंकवाद्यांविरोधातील ही मोहीम भविष्यातही सुरूच राहणार आहे. त्यांनी विपक्षाचे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले, ज्या अंतर्गत विरोधक वारंवार असा दावा करत आहेत की भारत-पाक सीझफायर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे झाला.
भाजपा खासदार म्हणाले, “विपक्षाकडे गोंधळ घालण्याशिवाय दुसरे काही काम उरलेले नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत स्पष्ट सांगितले की जेव्हा पाकिस्तानचे डीजीएमओ (डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स) यांनी भारतीय डीजीएमओंशी संपर्क साधला आणि शस्त्रसंधीची विनंती केली, तेव्हाच भारताने सीझफायर मान्य केले.
हेही वाचा..
‘अलमारी का अचार’ चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार
‘हिंदू देशभक्त असतो, देशविघातक कारवाया करत नसतो’
अमेरिका ३५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावतो
बांगलादेशमध्ये बीएनपी आणि एनसीपी समर्थकांमध्ये राडा
पंतप्रधान मोदींनी संसदेत ठामपणे सांगितले की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीत कोणत्याही तिसऱ्या देशाचा किंवा कोणत्याही जागतिक नेत्याचा काहीही सहभाग नव्हता. भारताने कोणाच्याही दबावाखाली हा निर्णय घेतलेला नाही. भाजपा खासदार पाल म्हणाले, भारताचा हेतू पाकिस्तानी जनतेशी युद्ध करणे नव्हे, तर पहलगाम हल्ल्यास जबाबदार असलेल्या अतिरेक्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना शिक्षा करणे हा होता. त्यांनी दावा केला की भारतीय लष्कराने या हल्ल्याशी संबंधित अतिरेक्यांना ठार केले आहे, जसे पंतप्रधान मोदींनी आधीच वचन दिले होते.
२९ जुलै रोजी संसदेत झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वरील विशेष चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदींनी भाग घेतला. त्यांनी आतंकवादाविरुद्ध भारताची भूमिका स्पष्ट करताना मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसवर टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगातील कोणत्याही नेत्याने भारतावर सीझफायरसाठी कोणताही दबाव आणलेला नाही. मोदींनी काँग्रेसला इशारा दिला की पाकिस्तानची भाषा बोलू नका. त्यांनी म्हटले, ज्या प्रकारचे प्रश्न पाकिस्तान उपस्थित करतो आणि पुरावे मागतो, तसे प्रश्न व भाषा विरोधकांनी वापरू नयेत. असे केल्याने भारतीय लष्कराच्या शौर्य आणि पराक्रमावर आघात होतो.







