24 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरधर्म संस्कृतीGanpati Special Train: एलटीटी - मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन

Ganpati Special Train: एलटीटी – मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन

Google News Follow

Related

श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मडगाव दरम्यान ६ अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. आधी जाहीर करण्यात आलेल्या २९६ गणपती विशेष ट्रेनव्यतिरिक्त या ६ ट्रेन चालवण्यात येणार असून, यामुळे गणपती विशेष ट्रेनची एकूण संख्या आता ३०२ झाली आहे.

६ गणपती विशेष गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे …

लोकमान्य टिळक टर्मिनस– मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष ट्रेन (एकूण ६ सेवा)

01003 साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सोमवार दि. २५.०८.२०२५, ०१.०९.२०२५ आणि ०८.०९.२०२५ रोजी ०८.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २२.४० वाजता मडगाव येथे पोहोचेल. (एकूण ३ सेवा)

01004 साप्ताहिक विशेष गाडी मडगाव येथून रविवार दि. २४.०८.२०२५, ३१.०८.२०२५ आणि ०७.०९.२०२५ रोजी १६.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (एकूण ३ सेवा)

थांबे : ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी.

संरचना : १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, २ इकोनॉमी वातानुकूलित तृतीय श्रेणी, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.

आरक्षण : गणपती विशेष गाडी क्रमांक 01003 साठी आरक्षण *०५.०८.२०२५* पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि [www.irctc.co.in](http://www.irctc.co.in) या संकेतस्थळावर सुरू होईल.

अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल आणि सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कानुसार आकारले जाईल.

या विशेष गाड्यांचे थांबे व वेळांचा तपशील पाहण्यासाठी कृपया [www.enquiry.indianrail.gov.in] संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा