29.6 C
Mumbai
Sunday, October 25, 2026
घरक्राईमनामाफलटण : ध्वजारोहणानंतर युवकाचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

फलटण : ध्वजारोहणानंतर युवकाचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Google News Follow

फलटण तहसिल कार्यालय येथे ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडताच एका युवकाने फलटण कोरेगावचे आमदार आणि सर्व ग्ग्रामस्थांसमोर बाटलीतून आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकऱ्यांनी त्यास रोखले व पोलिसांच्या ताब्यात दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, निखिल निंबाळकर असे आत्मदहनाच प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव असून तो राजाळे येथील रहिवाशी आहे. स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर प्रहार शेतकरी व दिव्यांग संघटनेच्या आंदोलकांशी फलटण कोरेगावचे आमदार चर्चा करत असताना निखिलने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रहार संघटनेतील एका जागरूक शेतकऱ्यानी निखिल यास थांबवत हातातील बाटली हिसकावून घेतली.यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

निखिलने अनेक महिन्यापासून राजाळे येथील जानाई मंदिर ते सरडे अतिक्रमित रस्त्याच्या प्रश्नासाठी तहसिल कार्यालय फलटण तसेच जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे निवेदने दिली असून यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही व न्याय मिळत नसल्याने आपण आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचे निखिल या युवकाने सांगितले.

दिव्यांग बांधवांचे प्रश्न समजून घेत असतानाच प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर ,तहसिलदार डॉ अभिजित जाधव नायब तहसीलदार अभिजित सोनवणे व इतर सर्व आधिकर्यांच्या उपस्थितीत हा प्रयत्न झाल्याने उपस्थित नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.

निखिलने स्वातंत्र्य दिना दिवशी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता फलटण ग्रामिण पोलिस गेली दोन दिवस त्याला शोधत होते मात्र तो त्यांना सापडलाच नाही आणि थेट कार्यक्रमा नंतर आंदोलकाशी अधिकारी बोलत असताना त्या ठिकाणी येऊन त्याने हा प्रयत्न केला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा