सेवा संकल्प प्रतिष्ठान बुलढाण्याच्या वतीने मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. मनोरुग्णांसाठी कार्य करणारी ही संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून ज्या ३१० माता बांधवांची देखभाल केली जाते, त्यांच्यासाठी दिवाळी किराणा व महिलांचे गाऊन यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.
तेल, मसाले, मिरची पावडर, चणा डाळ, साखर ई. साहित्य व महिला माउलींच्या गाऊन साठी मदत हवी आहे. या सगळ्यासाठी दरमहा ८० ते ९० हजार रुपयांचा किराणा लागतो. सकाळी पोटभर नाश्ता-दूध व २ वेळ पूर्ण जेवण आणि दुपारी चहा बिस्कीट आपण माऊलींना देत असतो.
सेवा संकल्प वर सध्या १६० महिला रुग्ण ऍडमिट आहेत. ज्या विविध राज्यांमधून आलेल्या आहेत. आक्रमक महिला माऊली ५० टक्क्यांच्या वर आहेत. त्यांच्यासाठी गाऊनची गरज आहे.
हे ही वाचा:
बालकांच्या मृत्यूनंतर भारतात ‘या’ तीन खोकल्याच्या सिरपविरुद्ध WHO चा इशारा
बिहारमध्ये काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलात जागावाटपावरून घोळ
आयपीएस अधिकारी आत्महत्या प्रकरणी हरियाणाचे पोलीस महासंचालक सक्तीच्या रजेवर
नक्षलवाद्यांनी मोबाईल टॉवर पेटवला
सध्या किराणा २-३ दिवस पुरेल एवढाच शिल्लक आहे. दिवाळीला दानशूर व्यक्तींकडून फराळ दिला जातो मात्र किराणा सामानाचीही आवश्यकता आहे, असे सेवा संकल्पने सांगितले आहे. ज्यांना वस्तू पोचवणे शक्य नाही त्यांनी आपल्या परीने आर्थिक मदत केली तरी चालेल. फक्त आपल्या मदतीचा स्क्रीनशॉट आम्हाला नावासह शेअर करा असे आवाहन करण्यात आले आहे.
Seva Sankalp Pratishthan
Union Bank, Br. Buldana
A/c No: 626502010012789
IFSC Code: UBIN0562653
Gpay 9404991927, 7038954125
सेवा संकल्प प्रतिष्ठान
पळसखेड सपकाळ
ता चिखली जि. बुलढाणा
9404991927







