महाराष्ट्रात विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. त्यात उबाठाचे आमदार आणि युवा नेते आदित्य ठाकरे हेच आता विरोधी पक्षनेते होणार अशी बातमी पसरली. त्यावर आदित्य ठाकरेंनी ही अफवा असून एकनाथ शिंदे यांचे २२ आमदार फुटणार असल्याची माहिती दिली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना सडेतोड उत्तर दिले.
सध्या विधिमंडळात विरोधी पक्षनेताच नाही, यावरून टीका होत आहे. विरोधी पक्षांची मागणी आहे की, सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षनेतेपद द्यावे. पण हा निर्णय सभापती, विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारितला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
त्यानंतर सोमवारी सकाळपासून एक बातमी चर्चेत होती ती म्हणजे विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव चर्चेत आहे. आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांचे २२ आमदार भाजपात दाखल होतील, असा दावा केला.
हे ही वाचा:
अमेरिका भारतीय तांदळावर नवा कर लावणार? काय म्हणाले ट्रम्प?
सीडीएफ बनल्यावर मुनीर यांनी दाखवल्या बेटकुळ्या
पाचन तंत्र मजबूत करण्यात कोण मदतगार?
योगामुळे सायनुसायटिसला मिळेल आराम
आदित्य ठाकरे यांच्या या दाव्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली की, जर असं म्हणायचं झालं तर तर उद्या कोणीही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे वीस आमदार आहेत, ते ही भाजपच्या गळाला लागले आहेत. पण असं कुणी म्हणालं म्हणून थोडीच काही होतं? फडणवीस पुढे म्हणाले की, जर असं म्हटलं तर उद्या कोणीही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे वीस आमदार आहेत, ते ही भाजपच्या गळाला लागले आहेत. असं कोणाच्या म्हणण्याने थोडंच काही होतं? आणि आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे? ते आमचेच आहेत. शिंदे सेना जी आहे तो आमचा मित्र पक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचे आमदार घेऊन काय करायचं आहे, आम्ही अशा प्रकारचं राजकारण करत नाही. उलट शिवसेना मजबूत झाली पाहिजे, त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.







