26 C
Mumbai
Sunday, December 21, 2025
घरदेश दुनिया१९९६ चा विश्वचषक जिंकून देणाऱ्या श्रीलंकन कर्णधाराला होणार अटक!

१९९६ चा विश्वचषक जिंकून देणाऱ्या श्रीलंकन कर्णधाराला होणार अटक!

तेल घोटाळ्याचे आरोप

Google News Follow

Related

श्रीलंकेला १९९६चा पहिला क्रिकेट विश्वचषक मिळवून देणाऱ्या संघाचा कर्णधार आणि माजी पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांना त्यांच्या मायदेशी मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणात अटक तयारी सुरू आहे. सोमवारी (15 डिसेंबर) न्यायालयात सांगण्यात आले की अर्जुन रणतुंगा आणि त्यांच्या भावावर तेल खरेदी प्रक्रियेत अनियमिततेचे गंभीर आरोप आहेत, ज्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

श्रीलंकेच्या भ्रष्टाचार विरोधी संस्थेच्या मते, अर्जुन रणतुंगा आणि त्यांच्या भावाने दीर्घकालीन तेल खरेदी करारांच्या प्रक्रियेत बदल केले आणि त्याऐवजी जास्त किमतीत स्पॉट खरेदीला मान्यता दिली. एजन्सीने न्यायालयाला सांगितले की, “२७ खरेदी करारांमधून सरकारला एकूण ८०० दशलक्ष श्रीलंकन ​​रुपयांचे (अंदाजे 23.5 कोटी रुपयांचे) नुकसान झाले.” हे करार २०१७ मध्ये झाले.

कोलंबो मॅजिस्ट्रेट असांगा बोडारागामा यांना माहिती देण्यात आली की अर्जुन रणतुंगा सध्या परदेशात आहे आणि तो देशात परतल्यानंतर त्याला अटक केली जाईल. या प्रकरणात त्यांचा मोठा भाऊ धम्मिका रणतुंगा यांना सोमवारी (१५ डिसेंबर) अटक करण्यात आली. २०१७ मध्ये ते सरकारी मालकीच्या सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष होते. सध्या त्यांना जामिनावर सोडण्यात आले.

न्यायालयाने धम्मिका रणतुंगा यांच्यावर प्रवास बंदी देखील घातली. त्यांच्याकडे श्रीलंका आणि अमेरिकेचे दुहेरी नागरिकत्व आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ मार्च रोजी होणार आहे. ६२ वर्षीय अर्जुन रणतुंगा हे श्रीलंकेच्या क्रिकेटमधील सर्वात मोठ्या नावांपैकी एक आहेत. या डावखुऱ्या फलंदाने  १९९६ मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून श्रीलंकेला पहिला आणि सर्वात ऐतिहासिक क्रिकेट विश्वचषक विजय मिळवून दिला. हा विजय देशाच्या क्रीडा इतिहासातील सर्वात मोठ्या कामगिरींपैकी एक मानला जातो.

कुटुंबातील आणखी एक सदस्य, अर्जुन रणतुंगा यांचे भाऊ आणि श्रीलंकेचे माजी पर्यटन मंत्री प्रसन्ना रणतुंगा यांनाही गेल्या महिन्यात विमा फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती. तो खटला अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे. यापूर्वी, जून २०२२ मध्ये, त्यांना एका व्यावसायिकाकडून पैसे उकळल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले होते आणि दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

हे ही वाचा:

विम्याच्या पैशांसाठी स्वतःच्या मृत्यूचे रचले नाट्य; मृतदेहासाठी केली हत्या

गोवा नाईटक्लब आगप्रकरणी आरोपी लुथ्रा बंधूना भारतात पाठवले

सेल्फीसाठी आले आणि कबड्डीपटूवर झाडल्या गोळ्या; सिद्धू मूसेवाला प्रकरणाशी संबंध?

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा