36 C
Mumbai
Saturday, October 3, 2026
घरदेश दुनियाभारत- युरोपियन युनियनमधील करारामुळे अमेरिकेचा होतोय तीळपापड! प्रकरण काय?

भारत- युरोपियन युनियनमधील करारामुळे अमेरिकेचा होतोय तीळपापड! प्रकरण काय?

अमेरिकेने व्यापार करारावर व्यक्त केली नाराजी

Google News Follow

Related

अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांनी युरोपीय देशांना इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे की, ते स्वतः विरुद्धच्या रशिया- युक्रेन युद्धाला अप्रत्यक्षपणे निधी देत आहेत. बेझंट यांच्या मते, जरी युरोपने रशियासोबतचा थेट ऊर्जा व्यापार लक्षणीयरीत्या कमी केला असला तरी, रशियन कच्च्या तेलापासून भारतात शुद्ध केलेल्या उत्पादनांच्या खरेदीद्वारे अजूनही मॉस्कोला पैसा येत आहे. भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात झालेल्या ‘सर्वोच्च’ मुक्त व्यापार करारामुळे अमेरिकेचा तिळपापड होत असल्याचे दिसून येत आहे.

माध्यमांशी बोलताना, बेझंट यांनी ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंवर लादलेल्या मोठ्या शुल्काचे समर्थन केले. ते म्हणाले की युरोपीयन सरकारे स्वतःची सुरक्षा धोरणे कमकुवत करत आहेत. “आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतावर २५ टक्के कर लादला आहे. गेल्या आठवड्यात काय झाले असेल ते पहा? युरोपने भारतासोबत व्यापार करार केला,” असे बेझंट म्हणाले. ते पुढे म्हणाले की, “रशियन तेल भारतात जाते, तिथे शुद्ध केले जाते आणि युरोप ती शुद्ध उत्पादने खरेदी करतो. ते स्वतः विरुद्धच्या युद्धाला वित्तपुरवठा करत आहेत.”

हे ही वाचा : 

भारत आणि युरोपियन युनियन करार, दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील समन्वयाचे उदाहरण!

हवालदाराची सव्वा चार लाखांची फसवणूक; ड्युटीवर असताना परस्पर काढले ‘पर्सनल लोन’

भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारात सोने, चांदी चमकली!

अमेरिका- इराणमध्ये युद्धाचा भडका उडणार?

बेझंट म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया- युक्रेन संघर्ष सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि या युद्धाच्या आर्थिक आणि राजकीय खर्चाचा मोठा वाटा अमेरिकेने उचलला आहे. २००७ मध्ये वाटाघाटी सुरू झाल्यानंतर जवळजवळ दोन दशकांपासून प्रलंबित असलेला भारत- ईयू मुक्त व्यापार करार आता निर्णायक टप्प्यावर आहे. बदलत्या जागतिक व्यापार गतिमानतेमध्ये हा करार भारत- ईयू आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारीचा कणा मानला जातो. तज्ञांच्या मते या कराराचा फायदा कापड, रसायने, रत्ने आणि दागिने, इलेक्ट्रिकल मशिनरी, चामड्याच्या वस्तू, ऑटोमोबाईल्स आणि पादत्राणे यासारख्या कामगार-केंद्रित क्षेत्रांना या कराराचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा