31 C
Mumbai
Saturday, November 21, 2026
घरविशेष'हायटेक' मुंबई पोलीस आता डिजिटल सुविधांनी होणार गतिमान

‘हायटेक’ मुंबई पोलीस आता डिजिटल सुविधांनी होणार गतिमान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकल्पांचे लोकार्पण

Google News Follow

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मुंबई पोलीस दलाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता, गतिमानता आणि उत्तरदायित्व येणार असून दल अधिक लोकाभिमुख होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने उभारण्यात आलेल्या विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुविधांचे लोकार्पण शनिवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविणे आणि नागरिकांना जलद सेवा देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि पोलीस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते.

हे ही वाचा:

काँग्रेसचे आता लांगुलचालनाचे नवे ‘टेंडर’

महाराष्ट्राच्या प्रशासनात मोठे फेरबदल

पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनचा भारताला शह देण्याचा प्रयत्न

पुष्पेंद्र गर्ग यांची एकट्याने जगप्रदक्षिणा

‘तपास सारथी’ आणि डिजिटल पोलिसिंगवर भर

‘नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत अमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठा बदल घडवला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नवीन फौजदारी कायद्यांनुसार इलेक्ट्रॉनिक पुरावे महत्त्वाचे ठरत आहेत. त्यामुळे एफआयआरपासून ते चार्जशीट आणि पुरावे व्यवस्थापनापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ‘हॅश व्हॅल्यू’च्या आधारे ‘एंड-टू-एंड डिजिटल’ केली जात आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने ‘तपास सारथी’ प्रणाली विकसित करण्यात येत असून सीसीटीव्ही, ड्रोन आणि सोशल मीडिया विश्लेषणाद्वारे गुन्हेगारीला आळा घातला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात तांत्रिक सहकार्य करणाऱ्या ‘बेल’चे राकेश कुमार, अनिता के. एस., किशोर कुमार नारु, ‘कॅप्सूल टेक्नॉलॉजी’चे नितीन कामत, अर्जुन के. आर., ‘स्केयुटेक’चे आदित्य प्रभू, दीपाली केळकर तसेच ‘मिनीटेक’चे प्रीतम करवीर आणि मयुर कुलकर्णी यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

मुंबई पोलिसांच्या ताफ्यातील नवे ‘स्मार्ट’ बदल
* डिजी आयडी स्मार्ट कार्ड : मुंबई पोलिसांची अधिकृत ओळख पटवून देणारे अत्याधुनिक स्मार्ट ओळखपत्र.
* अधिकारी-अंमलदारांना टॅब्लेट : दैनंदिन कामकाज वेगवान आणि कागदविरहित करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना टॅब्लेटचे वितरण.
* अँटी-नार्कोटिक्स तपास वाहन : अमली पदार्थविरोधी कारवाई आणि घटनास्थळीच फॉरेन्सिक तपासणी अधिक प्रभावी करण्यासाठी अँटी-नार्कोटिक्स सेलच्या ताफ्यात अत्याधुनिक व्हॅनचा समावेश (मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवा झेंडा).
* मुंबई पोलीस एकात्मिक कार्यप्रणाली (MPIS) : दलातील विविध विभागांच्या कामकाजात समन्वय साधणारी एकच मध्यवर्ती डिजिटल प्रणाली.
* सिटीझन ॲप : नागरिकांना पोलीस ठाण्यात न जाता डिजिटल माध्यमातून विविध सेवांचा सहज लाभ घेता येण्यासाठी विशेष ॲप.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा