31 C
Mumbai
Saturday, November 21, 2026
घरविशेषमहाराष्ट्राच्या प्रशासनात मोठे फेरबदल

महाराष्ट्राच्या प्रशासनात मोठे फेरबदल

चार वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

Google News Follow

महाराष्ट्रातील प्रशासकीय यंत्रणेत मोठी खांदेपालट करण्यात आली आहे. राज्य सरकारने चार वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ आणि राज्यकर विभागातील महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांत राज्यातील सात वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने प्रशासकीय वर्तुळात या निर्णयांची चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

या फेरबदलांमध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेल्या अशोक काकडे यांची मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता दिव्यांग कल्याण विभागाच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत असलेले प्रवीण कुंडलिक पुरी यांची महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बालकांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यासंदर्भातील प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचे मानले जाते.

हे ही वाचा:
हाँगकाँग, नॅस्डॅकपेक्षा एनएसई वरचढ

परदेशी असूनही सोनिया गांधी मारुतीच्या ५० टक्के मालक कशा?

पन्नू हत्या कटप्रकरणी निखिल गुप्ताला १९ वर्षांचा तुरुंगवास

अमेरिकेच्या शेअर बाजारात एआय कंपन्यांना मोठा झटका

याशिवाय, गुलाब राजाराम खरात यांची महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री सचिवालयातील मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून कार्यरत असलेले मकरंद प्रल्हाद देशमुख यांची मुंबईतील राज्यकर विभागाच्या सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे राज्यातील आर्थिक आणि महसूल प्रशासनातील महत्त्वाच्या पदांवरही बदल झाले आहेत. विविध विभागांमधील कामकाज अधिक प्रभावीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने या नियुक्त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, राज्य सरकारने यापूर्वीही तीन वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. त्यानंतर आता आणखी चार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याने अवघ्या तीन दिवसांत सात अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये बदल झाला आहे. विविध विभाग, महामंडळे आणि महत्त्वाच्या आयोगांमध्ये झालेल्या या फेरबदलांमुळे राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत नव्या जबाबदाऱ्यांचे वाटप झाले आहे. आता नव्याने नियुक्त झालेले अधिकारी आपल्या विभागांचा कारभार कशा पद्धतीने पुढे नेतात आणि त्यांच्या कामकाजातून कोणते बदल घडतात, याकडे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा