28 C
Mumbai
Monday, April 20, 2026
घरविशेषकॉर्पोरेट ऑफिसमध्ये हव्या धर्म-संस्कृतीच्या खाणाखुणा!

कॉर्पोरेट ऑफिसमध्ये हव्या धर्म-संस्कृतीच्या खाणाखुणा!

स्वतःच्या संस्कृतीची लाज म्हणजे स्वतःच्याच घरात परके

Google News Follow

Related

एखाद्या बड्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये गेल्यावर आपल्याला काय दिसते? जर एखादा हिंदू कर्मचारी कपाळावर टिळा लावून आला किंवा त्याने हातात गंडा दोरा बांधला असेल, तर त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अनेकदा ‘हा बुरसटलेल्या विचारांचा आहे’ असा असतो. ऑफिसमध्ये दिवाळी साजरी करताना ‘इको-फ्रेंडली’ आणि ‘फटाकेमुक्त’ सण साजरा करण्याचे शहाणपण शिकवले जाते; मात्र त्याच ठिकाणी जेव्हा दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनांसाठी विशेष सवलती दिल्या जातात, तेव्हा प्रश्न उभा राहतो की, हा न्याय फक्त हिंदू सणांनाच का लागू होतो?

हे घडते कारण आपल्याला आपली ओळख प्रकट करायला लाज वाटते. आमच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मात्र आम्ही या गोष्टी जाणीवपूर्वक करतो. येथे तुम्हाला भारतमातेची प्रतिमा दिसेल, तुळशीवृंदावन दिसेल, राष्ट्र ध्वज तिरंगा दिसेल, ‘अखंड भारता’चा नकाशा दिसेल आणि छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची प्रचिती येईल. माझ्या केबिनमध्ये श्रीकृष्णाची भव्य मूर्ती आहे. दरवर्षी गणेशोत्सवात आम्ही कार्यालयात दीड दिवसाचा गणपती बसवतो. ढोल-ताशांच्या गजरात श्रीगणेशाचे आगमन होते आणि दीड दिवस भजन-कीर्तनाने संपूर्ण वातावरण मंगलमय होऊन जाते.

हे ही वाचा:

प्रशांत कारुळकर यांना एक्स सिक्युरिटी

जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेते शब्बीर अहमद शाह यांना अटक

हॉर्मूज सामुद्रधुनी खुली; भारताकडे येणाऱ्या ४१ जहाजांना हिरवा कंदील

मेटाकडून १६ हजार कर्मचाऱ्यांना धक्का; २० मेपासून मोठी नोकरकपात
स्वतःच्या संस्कृतीची लाज वाटणे, म्हणजे स्वतःच्याच घरात परक्यासारखे राहण्यासारखे आहे. ‘अखंड भारता’च्या नकाशाकडे पाहताना आपल्याला ‘राजकीय’ ठरवले जाईल, अशी भीती का वाटावी? कॉर्पोरेट ऑफिसमध्ये तुळशीचे रोप असणे हे केवळ धार्मिक प्रतीक नसून, ते आपल्या मुळांशी जोडले जाण्याचे लक्षण आहे.

ज्या कार्यालयांमध्ये नमाजसाठी सवलत दिली जाते, तिथे भजन-कीर्तनालाही परवानगी मिळायला हवी. हिजाब आणि बुरखा ही स्त्री-दास्यत्वाची लक्षणे असून प्रगत विचारांच्या समाजात त्यांना स्थान असू नये. जर टोपी किंवा हिजाब हा वैयक्तिक श्रद्धेचा भाग म्हणून स्वीकारला जात असेल, तर मग भगवा गमछा, कपाळावरचे कुंकू किंवा नऊवारी साडीचेही स्वागतच व्हायला हवे.

आज नाशिकसारख्या शहरात—जे अध्यात्माचे आणि संस्कृतीचे केंद्र आहे—तिथे जर ‘कॉर्पोरेट जिहाद’ होत असेल, तर त्याचे मुख्य कारण हिंदूंचे मौन आहे. आपल्या देव-देवतांची हेटाळणी होताना जर आपल्याला संताप येत नसेल, तर आपल्या श्रद्धा डळमळीत आहेत असे समजावे. म्हणूनच या श्रद्धा मजबूत करण्याचे काम आपण केले पाहिजे.

आपल्या धर्म-संस्कृतीचा पुरेसा अभिमान बाळगला पाहिजे. ज्यांना जाळीदार टोपी, हिजाब आणि बुरख्याचे कौतुक वाटते, त्यांना हे स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगितले पाहिजे की, हा पाकिस्तान नाही!

आम्ही कोणत्याही धर्माचा द्वेष करणार नाही, कारण ती आमची संस्कृती नाही. परंतु, जर कुणी आमच्या धर्मावर आणि श्रद्धांवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला, तर तो सहन केला जाणार नाही; हे हिंदूंनी आता आपल्या कृतीतून स्पष्टपणे दाखवून देण्याची वेळ आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा