28.9 C
Mumbai
Monday, May 4, 2026
घरस्पोर्ट्सराजस्थानची अव्वल संधी हुकली

राजस्थानची अव्वल संधी हुकली

Google News Follow

Related

आयपीएल २०२६ मधील जयपूर येथे झालेल्या ४३व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला अव्वल स्थान गाठण्याची मोठी संधी होती; मात्र दिल्ली कॅपिटल्सने शानदार पाठलाग करत हा सामना जिंकला आणि राजस्थानचा प्लॅन फसवला. या विजयासह दिल्ली सहाव्या स्थानावर पोहोचली आहे.

टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानची सुरुवात खराब झाली. वैभव सूर्यवंशी (४) आणि यशस्वी जायसवाल (६) लवकर बाद झाले. त्यानंतर कर्णधार रियान पराग याने ५० चेंडूत ९० धावांची खेळी करत डाव सावरला. डोनोवन फरेरा (१४ चेंडूत ४७) आणि ध्रुव जुरेल (३२ चेंडूत ४२) यांच्या योगदानामुळे राजस्थानने २० षटकांत ६ बाद २२५ धावा केल्या.

२२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. पाथुम निसांका (३३ चेंडूत ६२) आणि केएल राहुल (४० चेंडूत ७५) यांनी पहिल्या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी करत विजयाची पायाभरणी केली. त्यानंतर नितीश राणा (१७ चेंडूत ३३), ट्रिस्टन स्टब्स (नाबाद १८) आणि आशुतोष शर्मा (नाबाद २५) यांच्या योगदानामुळे दिल्लीने १९.१ षटकांत ३ बाद २२६ धावा करत सामना ७ विकेट्सने जिंकला.

हेही वाचा :

सूर्यवंशी बाद झाला; जेमिसनला दणका बसला!

सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करणे मूलभूत अधिकार नाही

बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल तर मुलींची बाजी!

भोंदू बाबा खरात प्रकरणात प्रतिभा चाकणकरांना ईडीचे समन्स

या सामन्यानंतर गुणतालिकेत पंजाब किंग्स १३ गुणांसह अव्वल, तर आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद प्रत्येकी १२ गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. राजस्थान रॉयल्सही १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स पाचव्या, तर दिल्ली कॅपिटल्स सहाव्या स्थानावर आहे.

दरम्यान, दिल्लीचा सलामीवीर केएल राहुल ४३३ धावांसह ऑरेंज कॅपधारक आहे, तर भुवनेश्वर कुमार १७ विकेट्ससह पर्पल कॅपवर कायम आहे. गुणतालिकेत अनेक संघ समान गुणांवर असल्याने नेट रनरेटमुळे क्रमवारीत फरक पडत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
305,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा