27 C
Mumbai
Sunday, October 4, 2026
घरस्पोर्ट्सनिखत जरीनला हरवणारी साक्षी चमकली!

निखत जरीनला हरवणारी साक्षी चमकली!

वर्ल्ड चॅम्पियन मीनाक्षीलाही धूळ चारत कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्ससाठी भारतीय संघात एन्ट्री

Google News Follow

Related

भारतीय बॉक्सिंगमध्ये नव्या स्टारचा उदय झाला असून युवा बॉक्सर साक्षी चौधरीने मोठा पराक्रम करत कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्ससाठी भारतीय संघात दमदार स्थान मिळवलं आहे. दोन वेळची वर्ल्ड चॅम्पियन निखत जरीनला सेमीफायनलमध्ये पराभूत केल्यानंतर साक्षीने आता फायनलमध्ये विद्यमान वर्ल्ड आणि एशियन चॅम्पियन मीनाक्षी हुड्डालाही मात देत आपली ताकद सिद्ध केली.

एनआयएस पटियाला येथे झालेल्या नॅशनल बॉक्सिंग ट्रायल्समध्ये साक्षीने ५१ किलो वजनी गटात जबरदस्त खेळ दाखवला. विशेष म्हणजे, साक्षीने याआधी २०२५ वर्ल्ड बॉक्सिंग कपमध्ये ५४ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. मात्र ट्रायल्समध्ये ती ५१ किलो गटात उतरली आणि तिथेही तिने प्रतिस्पर्ध्यांना चकित केलं.

फायनलमध्ये साक्षीसमोर होती विद्यमान वर्ल्ड आणि एशियन चॅम्पियन मीनाक्षी हुड्डा. पण साक्षीने आत्मविश्वासपूर्ण खेळ करत विजय मिळवला आणि थेट कॉमनवेल्थ गेम्स तसेच एशियन गेम्ससाठीचं तिकीट पक्कं केलं.

याआधीच्या सेमीफायनलमध्ये साक्षीने भारताची स्टार बॉक्सर निखत जरीनला पराभूत करत मोठा धक्का दिला होता. निखत ही दोन वेळची वर्ल्ड चॅम्पियन, कॉमनवेल्थ गेम्स सुवर्णपदक विजेती आणि एशियन गेम्स कांस्यपदक विजेती आहे. त्यामुळे साक्षीच्या या विजयाची देशभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे मीनाक्षी हुड्डाने सेमीफायनलमध्ये माजी वर्ल्ड चॅम्पियन नीतू घंघासला हरवलं होतं. मात्र फायनलमध्ये साक्षीसमोर तिचा निभाव लागला नाही.

यावेळी ५१ किलो गटात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व युवा बॉक्सरकडे जाणार आहे. कारण अनुभवी निखत जरीन आणि नीतू घंघास या दोघींनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.

गेल्या महिन्यात मंगोलियातील उलानबाटार येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये निखत जरीनला थेट पात्रता मिळवण्यात अपयश आलं होतं. ती उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली होती, पण चीनच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या वू यू हिच्याकडून तिला ०-५ अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता.

हेही वाचा :

डॉलरऐवजी आता युआनमध्ये कर्ज; पाकिस्तानने पहिल्यांदाच जारी केला ‘पांडा बॉन्ड’

सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी

युद्धसंकटाने तेलबाजार पेटला

कडक उन्हात आरोग्यासाठी वरदान ठरतेय कैरी!

दरम्यान, सचिन सिवाच (पुरुष ६० किलो), प्रीती पवार (महिला ५४ किलो) आणि प्रिया घंघास (महिला ६० किलो) यांनीही एशियन चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्ससाठी पात्रता मिळवली आहे.

तर जैस्मिन लॅम्बोरिया (महिला ५७ किलो) आणि अरुंधती चौधरी (महिला ७० किलो) यांनी फक्त कॉमनवेल्थ गेम्ससाठी पात्रता मिळवली. त्यांच्या वजन गटांचा एशियन गेम्समध्ये समावेश नाही.

यंदाचे कॉमनवेल्थ गेम्स २३ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान ग्लासगो येथे होणार आहेत. त्यानंतर १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरदरम्यान जपानमधील आइची-नागोया येथे एशियन गेम्स रंगणार आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा