31.4 C
Mumbai
Friday, June 12, 2026
घरबिजनेससेन्सेक्सची १६९५ अंकांची झेप, तर निफ्टीत ४६१ अंकाची उसळी

सेन्सेक्सची १६९५ अंकांची झेप, तर निफ्टीत ४६१ अंकाची उसळी

गुंतवणूकदारांना १० लाख कोटींचा फायदा

Google News Follow

Related

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपुष्टात येण्याच्या आशेने भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडची किंमत ९० डॉलर प्रति बॅरलच्या खाली घसरत सुमारे ८८ डॉलरपर्यंत आली, तर याच सकारात्मक संकेतांचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. बीएसई सेन्सेक्सने व्यवहारादरम्यान तब्बल १,६९५ अंकांची उसळी घेत ७५,५२७ वर बंद झाला, तर निफ्टीने ४६१ अंकाची उसळी घेत २३,६०० चा महत्त्वाचा टप्पा पार केला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या तणावावर तोडगा निघण्याचे संकेत दिल्यानंतर जागतिक गुंतवणूकदारांमध्ये आशावाद निर्माण झाला. मध्यपूर्वेतील संघर्ष कमी होण्याची शक्यता वाढल्याने कच्च्या तेलाच्या किमतींवर दबाव आला. काही दिवसांपूर्वी ९२ ते ९४ डॉलरच्या दरम्यान असलेले ब्रेंट क्रूड घसरून ८८ डॉलरच्या आसपास आल्याने ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासारख्या देशांना मोठा दिलासा मिळाला.
हे ही वाचा:
हॉर्मुझ सामुद्रधुनी जवळील १८ हजार भारतीय खलाशांना हाय अलर्ट

मीनाक्षी नटराजन यांना दणका, सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार

पश्चिम बंगालच्या ‘पुष्पा’ला पोलिसांनी हाफ पँटमध्ये फिरवले

कच्च्या तेलाच्या दरघसरणीनंतर सोने-चांदीची झेप

तेलाच्या किमती घसरल्याने भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अनेक सकारात्मक संकेत मिळाले आहेत. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे ८५ टक्के कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे तेलाच्या दरात प्रति बॅरल १ डॉलरची घट झाली तरी देशाच्या आयात बिलात हजारो कोटी रुपयांची बचत होऊ शकते. तेल स्वस्त झाल्याने महागाई कमी राहण्यास मदत होते, उद्योगांचा उत्पादन खर्च घटतो आणि कंपन्यांच्या नफ्यात वाढ होण्याची शक्यता निर्माण होते.

याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारात बँकिंग, वित्तीय सेवा, वाहन, विमान वाहतूक, रंगनिर्मिती, सिमेंट आणि तेल विपणन कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी खरेदी झाली. बाजारातील तेजीमुळे बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांच्या एकूण बाजारमूल्यात सुमारे ७ लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली. काही अंदाजांनुसार गुंतवणूकदारांच्या संपत्तीत एका दिवसात जवळपास १० लाख कोटी रुपयांची भर पडली.

दरम्यान, रुपयामध्येही मजबुती दिसून आली. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारावरील विश्वास आणखी वाढला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडूनही खरेदीचा ओघ कायम राहिल्याने बाजारातील तेजीला अतिरिक्त बळ मिळाले.

बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिका-इराण शांतता चर्चांमध्ये सकारात्मक प्रगती झाली आणि ब्रेंट क्रूडची किंमत ९० डॉलरच्या खालीच राहिली, तर भारतीय बाजारासाठी हे अनुकूल ठरू शकते. निफ्टीला २३,६०० आणि सेन्सेक्सला ७५,००० च्या वर टिकून राहण्यात यश मिळाल्यास पुढील काही दिवसांत आणखी तेजीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र मध्यपूर्वेतील घडामोडी आणि जागतिक आर्थिक संकेतांवर बाजाराची नजर कायम राहणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
314,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा