28.9 C
Mumbai
Saturday, October 10, 2026
घरराजकारणओवैसींनी केले स्मितचे कौतुक, पण ठाकरे थंडच!

ओवैसींनी केले स्मितचे कौतुक, पण ठाकरे थंडच!

भारतीय वैमानिकाचे कौतुक करण्यात कंजुषी

Google News Follow

Related

फ्लाय दुबई या विमानात झालेल्या हल्ल्यानंतर प्रसंगावधान राखत १८० पेक्षा अधिक प्रवाशांचे जीव वाचवणाऱ्या स्मित माछर या भारतीय वैमानिकाचे जगभरात कौतुक होत आहे. जगभरातील विविध नेत्यांनी त्याच्या या पराक्रमाबद्दल त्याचे अभिनंदन केले आहे. एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनीही स्मितच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एकीकडे स्मितने केलेल्या कामगिरीनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी कौतुक केले आणि त्याचे आभार मानले पण भारतातील विरोधकांनी माछर याचे अभिनंदन केलेले नाही. प्रामुख्याने राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासारख्या प्रमुख पक्षांनी त्याचे कौतुक केले नाहीच पण उद्धव ठाकरे, राज ठाकरे या बंधूंनीही त्याचे कौतुक केले नाही.

हे ही वाचा:

नोएडात ४३व्या मजल्यावरून तरुणाची आत्महत्या

मुंबईसह निम्म्या महाराष्ट्रातून मान्सूनची माघार

शिवाजी पार्कवर आंदोलन ‘कॉक्रोच’ना भोवले

अखेरच्या टप्प्यात ११ सुवर्ण जिंकत भारत ठरला चौथा

दोन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंनी आरिफ बामणे या मुस्लिम युवकाचे मातोश्रीवर बोलावून कौतुक केले होते. त्यांनी मुंबईच्या समुद्रात झालेल्या एका अपघातात अनेक प्रवाशांचे प्राण वाचवले होते. त्यावेळी या आरिफ बामणेला मातोश्रीवर बोलावून उद्धव ठाकरे यांनी त्याचा सत्कार केला होता आणि त्याचे अभिनंदन केले होते, याची आठवण सोशल मीडियात करून दिली जात आहे. पण दोन तीन दिवस उलटल्यानंतरही स्मितचे कौतुक करणारे एखादे ट्विट ठाकरे बंधूंकडून आलेले नाही, याबद्दल आश्चर्यही व्यक्त होत आहे.

असदुद्दीन ओवैसी यांना यासंदर्भात विचारल्यावर त्यांनी कॅप्टन स्मितने केलेल्या पराक्रमाचे कौतुक केले तसेच त्याने एवढ्या लोकांचे जीव वाचवले याबद्दल त्याला शाबासकी दिली. शिवाय, त्याच्या प्रकृतीला आराम पडावा अशी प्रार्थनाही केली. ओवैसी यांनी घेतलेल्या या भूमिकेबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे पण त्यांचे कौतुकही केले जात आहे. त्यांनी विरोधकांप्रमाणे कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले नाही, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात फिरत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा