30.8 C
Mumbai
Sunday, June 14, 2026
घरस्पोर्ट्सगुरबाजच्या विक्रमी शतकामागे गौतम गंभीर

गुरबाजच्या विक्रमी शतकामागे गौतम गंभीर

Google News Follow

Related

अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज याने भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेत तुफानी फलंदाजी करत अवघ्या ५१ चेंडूत १०२ धावा ठोकल्या. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ८ षटकार लगावत भारतीय गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. विशेष म्हणजे, या दमदार शतकीय खेळीचे श्रेय गुरबाजने भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना दिले आहे.

सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गुरबाज म्हणाला, “भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यानंतर माझी गौतम गंभीर सरांशी खूप चांगली चर्चा झाली होती. त्या संवादामुळे मला शॉट निवडीमध्ये मोठी सुधारणा करता आली. मी त्यांच्या सूचनांवर नेट्समध्ये मेहनत घेतली आणि त्याचा फायदा आजच्या डावात झाला.”

गुरबाजने सांगितले की, कसोटी सामना संपल्यानंतर त्याने गंभीर यांच्याकडे स्वतःहून मार्गदर्शन मागितले होते. “मला माझी शॉट सिलेक्शन सुधारायची होती. गंभीर सरांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. आज त्या अंमलात आणण्यात मला यश आले. मी फक्त सकारात्मक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा झाला,” असे तो म्हणाला.

अफगाणिस्तानचा सर्वात वेगवान वनडे शतकवीर

धर्मशालातील सामन्यात गुरबाजने अवघ्या ४८ चेंडूत शतक पूर्ण करत अफगाणिस्तानकडून वनडेत सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. हे त्याच्या कारकिर्दीतील नववे वनडे शतक ठरले.

‘रणनीती साधी होती, फक्त सकारात्मक खेळायचे’

आपल्या डावामागील रणनीती स्पष्ट करताना गुरबाज म्हणाला, “हा २५ षटकांचा सामना असल्यामुळे सुरुवातीपासूनच आक्रमक राहण्याचा विचार होता. मात्र मी माझ्या खेळावर आणि तयारीवर विश्वास ठेवला. संघासाठी योगदान देता आले याचा आनंद आहे.”

शतक असूनही अफगाणिस्तानचा पराभव

गुरबाजच्या झंझावाती शतकानंतरही अफगाणिस्तानला विजय मिळवता आला नाही. भारताच्या पदार्पणवीर गुरनूर बरार आणि हर्ष दुबे यांनी प्रत्येकी ३ बळी घेत अफगाणिस्तानचा डाव २४.५ षटकांत १९४ धावांवर रोखला. त्यानंतर भारताने हे लक्ष्य २२.५ षटकांत ३ विकेट्स गमावून सहज गाठले.

पिचबाबतही व्यक्त केले मत

धर्मशालातील खेळपट्टीबाबत गुरबाज म्हणाला, “ही फलंदाजीसाठी फार सोपी विकेट नव्हती. विशेषतः फिरकी गोलंदाजांना थोडी मदत मिळत होती आणि चेंडू वळतही होता. मात्र माझा भर आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवण्यावर होता.”

भारतात भारताविरुद्ध झळकावलेले हे शतक आपल्या कारकिर्दीतील खास क्षण असल्याचे सांगत गुरबाजने आपल्या मेहनतीचे फळ मिळाल्याची भावना व्यक्त केली. त्याचवेळी गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाचा उल्लेख करत त्यांचे विशेष आभारही मानले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
314,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा