26.9 C
Mumbai
Wednesday, July 1, 2026
घरबिजनेससेन्सेक्स २५० अंकांनी घसरला; निफ्टी २३,९०० च्या खाली

सेन्सेक्स २५० अंकांनी घसरला; निफ्टी २३,९०० च्या खाली

आयटी शेअर्सवर विक्रीचा दबाव

Google News Follow

Related

भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात घसरणीसह व्यवहार संपवले. दिवसाची सुरुवात सकारात्मक झाली असली, तरी नफावसुली आणि आयटी क्षेत्रातील जोरदार विक्रीमुळे बाजाराने अखेरीस लाल निशाणावर दिवसाची सांगता केली. बीएसई सेन्सेक्स २४९.७० अंकांनी घसरून ७६,४७८.६७ वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी ८०.५० अंकांच्या घसरणीसह २३,८६५.७५ वर स्थिरावला. त्यामुळे निफ्टी पुन्हा एकदा २३,९०० या महत्त्वाच्या पातळीखाली घसरला.

दिवसभर बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. सुरुवातीला जागतिक बाजारांकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे खरेदीचा उत्साह दिसून आला होता. मात्र, महिनाअखेरची डेरिव्हेटिव्ह करारांची एक्स्पायरी, नफावसुली आणि आयटी क्षेत्रातील विक्री वाढल्याने बाजारावरील दबाव अधिकच वाढला. अखेरच्या तासात विक्रीचा वेग वाढल्याने निर्देशांकांनी दिवसातील बहुतांश वाढ गमावली.
हे ही वाचा:
घसरला… लढला… जिंकला! सिनरची विंबल्डनमध्ये विजयी एन्ट्री

मेसी-रोनाल्डोसारखी प्रतिस्पर्धा पुन्हा होणार नाही!

चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले, एक विद्यार्थी दगावला

तब्बल ३५ वर्षांनंतर सरला भट अत्याचार, हत्या प्रकरणात यासिन मलिकविरोधात आरोपपत्र

आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याचा परिणाम बाजारावर स्पष्टपणे दिसून आला. त्याचबरोबर मेटल आणि काही वित्तीय समभागांमध्येही विक्रीचा दबाव कायम राहिला. दुसरीकडे फार्मा, ग्राहक टिकाऊ वस्तू आणि रिअल्टी क्षेत्रातील काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी झाल्याने बाजाराला काहीसा आधार मिळाला.

आजच्या व्यवहारात सर्वाधिक चर्चेत राहिला तो मारुती सुझुकीचा शेअर. जागतिक ब्रोकरेज संस्था जेफरीजने कंपनीच्या शेअरचे रेटिंग सुधारत लक्ष्य किंमत मोठ्या प्रमाणात वाढवल्यानंतर मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये जवळपास ५ टक्क्यांची जोरदार उसळी पाहायला मिळाली. या वाढीमुळे ऑटो क्षेत्राला काहीसा आधार मिळाला असला, तरी एकूण बाजारातील कमजोरी कायम राहिली.

बाजारतज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील व्याजदरांबाबतची अनिश्चितता, परदेशी गुंतवणूकदारांची सावध भूमिका आणि तिमाही निकालांच्या हंगामापूर्वी सुरू झालेली नफावसुली यामुळे अल्पकालीन काळात बाजारात चढ-उतार कायम राहू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी दर्जेदार समभागांवर लक्ष ठेवून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा