29.6 C
Mumbai
Wednesday, October 21, 2026
घरस्पोर्ट्सदिमित्रोवची जिद्द जिंकली; विंबल्डनमध्ये चौथ्या फेरीत धडक

दिमित्रोवची जिद्द जिंकली; विंबल्डनमध्ये चौथ्या फेरीत धडक

Google News Follow

विंबल्डन २०२६ मध्ये बल्गेरियाचा अनुभवी टेनिसपटू ग्रिगोर दिमित्रोव याने दमदार पुनरागमन करत चौथ्या फेरीत प्रवेश केला. तब्बल तीन तास ३२ मिनिटे रंगलेल्या रोमांचक लढतीत त्याने इटलीच्या मातेओ बेरेटिनीचा ६-३, ६-४, ३-६, ५-७, ६-३ असा पराभव केला.

गेल्या वर्षी याच कोर्टवर दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागलेल्या दिमित्रोवसाठी हा विजय भावनिक ठरला. सामना जिंकल्यानंतर त्याने हात उंचावत आनंद व्यक्त केला.

सुरुवातीचे दोन सेट दिमित्रोवने सहज जिंकत २-० अशी आघाडी घेतली होती. मात्र बेरेटिनीने जोरदार पुनरागमन करत सलग दोन सेट जिंकले आणि सामना निर्णायक पाचव्या सेटमध्ये नेला. अखेरच्या सेटमध्ये दिमित्रोवने महत्त्वाच्या क्षणी प्रतिस्पर्ध्याची सर्व्हिस ब्रेक करत ६-३ ने सेट आणि सामना आपल्या नावावर केला.

३५ वर्षीय दिमित्रोवसाठी मागील काही महिने खडतर ठरले होते. दुखापतीमुळे तो दीर्घकाळ कोर्टपासून दूर राहिला. जून २०२६ पर्यंत त्याला टूर स्तरावर केवळ दोन सामने जिंकता आले होते. मात्र डब्लिन एटीपी चॅलेंजर आणि मॅलोर्का एटीपी २५० स्पर्धेतील चांगल्या कामगिरीनंतर त्याने पुन्हा लय मिळवली आणि तीच कामगिरी विंबल्डनमध्येही कायम ठेवली.

सध्या एटीपी क्रमवारीत १४६व्या स्थानावर असलेल्या दिमित्रोवसमोर आता चौथ्या फेरीत वाइल्ड कार्डधारक आर्थर फेरी याचे आव्हान असेल. फेरीने जिजो बर्ग्सचा पाच सेटच्या संघर्षपूर्ण सामन्यात पराभव करत प्रथमच ग्रँड स्लॅमच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे.

विशेष म्हणजे, २००२ नंतर प्रथमच दोन वाइल्ड कार्ड खेळाडूंनी ग्रँड स्लॅमच्या अंतिम १६ मध्ये स्थान मिळवण्याचा विक्रम यंदाच्या विंबल्डनमध्ये नोंदवला गेला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा